शिवशौर्य यात्रेचा’ शुभारंभ उद्या दोडामार्ग मधून
शिव राज्याभिषेकाचे 350 वे वर्ष आणि विश्व हिंदू परिषदेचे हिरक महोत्सवी वर्ष या औचित्यावर विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल,कोकण प्रांत आयोजीत ‘शिवशौर्य यात्रेचा’ शुभारंभ आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग येथे शनिवार दिनांक ३० सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ठीक 8.00 वा. होत आहे.अश्या यात्रा संपूर्ण देशभर संपन्न होणार आहेत.
या देशव्यापी ‘शौर्य जागरण’ यात्रे मध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या जिल्हयाचे पालकमंत्री मा.रविंद्रजी चव्हाण साहेब स्वतः हजर राहून सहभागी होत आहेत. सोबतच प्रदेश उपाध्यक्ष अतुलजी काळसेकर,प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष मा.प्रभाकर सावंत आ.नितेश राणे, मा.निलेशजी राणे, मा.राजनजी तेली,आणी सर्वच भाजपा पदाधिकारी तसेच कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
आपण सर्व हिंदू प्रेमी नागरिक,भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हिंदू धर्मविरोधी कारवायांच्या विरोधात समाजाला जागृत करण्यासाठी ‘शौर्य जागरण’ यात्रे मध्ये सहभागी होऊ.
सर्वानी या यात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व यात्रेचे मनोभावे स्वागत करावे असे आवाहन भाजपा जिल्हा कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
*यात्रेचा प्रवास*
*शनिवार दि.३० सप्टेंबर २०२३*
*दोडामार्ग :* सकाळी ८.०० वा सुरू
*बांदा :* सकाळी ११.००वा दर्शन थांबा
*सावंतवाडी :* दुपारी १२.०० ते २ दर्शन थांबा
*कुडाळ :* दुपारी २.३० ते सायं ४.००वा.
*मालवण :* सायं ५.०० वा कुंभारमाठ येथे आगमन,मामा वरेरकर नाट्यगृह येथे सायं ७.०० वा.जाहीर सभा.
*रविवार दि.१ ऑक्टोबर २०२३*
*कणकवली :* सकाळी १०.०० वा.दर्शन थांबा
*नांदगाव :* दुपारी १२.३०वा.दर्शन थांबा
*कासार्डे :* दुपारी १.१०वा.स्वागत थांबा
*तळेरे :* दुपारी २.३०वा.स्वागत थांबा
*खारेपाटण :* दुपारी ३.३० वाजता दक्षिण रत्नागिरी कडे यात्रा प्रस्थान.यानंतर ही यात्रा दिनांक 15 ऑक्टोबर पर्यंत कोकण प्रांताचा प्रवास पूर्ण करणार आहे.