You are currently viewing जागतिक पर्यटन दिन 27 सप्टेंबर ला किल्ले सिंधुदुर्ग येथे उत्साहात साजरा

जागतिक पर्यटन दिन 27 सप्टेंबर ला किल्ले सिंधुदुर्ग येथे उत्साहात साजरा

मालवण:

 

जागतिक पर्यटन दिवस 2023 भारत पर्यटन मंत्रालय आणि पर्यटन व्यावसायिक महासंघ कोकण व तारकर्ली पर्यटन विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले सिंधुदुर्ग या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात विद्यानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल कसाल आणि एस आर एम कॉलेज कुडाळ येथील युवा टुरिझम क्लब च्या नव्याने स्थापन झालेल्या क्लब च्या विद्यार्थ्यानी सहभाग घेतला.कार्यक्रमाचे प्रमुख अथिति म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री प्रशांत पानवेकर याचे स्वागत भारत पर्यटन विभाग सहसंचालक सौ भावना शिंदे यांनी केले त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी चालेल्या विविध उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती ची त्यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली स्थानिक किल्ला रहिवासी नागरिक श्री पाडावे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग किल्ले चा गोरवशाली इतिहासाची महती सर्व उपस्थितांना दिली तसेच सिंधुदुर्ग किल्ल्यावर भग्न झालेल्या राजवाडा,राजदरबार अन्य पुरातत्व विषय पुनर्जीवित होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न्न होण्यासाठी आवाहन केलेल.युवा टुरिझम च्या नोंदणी झालेल्या विद्यार्थीनि आपला परिसर आपले कल्चर जपून पर्यटन आणि पर्यावरण यांचे समतोल राखून पर्यटन विकास करावा यांचे मार्गदर्शन पर्यटन सहसंचालक सौ भावना शिंदे यांनी केले तसेच त्यांच्या हस्ते 400 पेक्षा जास्त होम स्टे धारकांना त्यांचा व्यवसाय वाढीहोण्यासाठी व येणाऱ्या पर्यटकांना होम स्टे धारकांना थेट संपर्क साधून राष्ट्रीय व आतंराष्ट्रीय पर्यटकांपर्यंत पोचण्यासाठी

ttdskokan.com ह्या वेबपोर्टल चे टी टी डी एस अध्यक्ष श्री सहदेव साळगावकर यांच्या उपस्थितीत उदघाटन करण्यात आले.

केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसार सर्व शाळा कॉलेजमध्ये युवा टुरिझम क्लब ची स्थापना करण्यात येत आहे. या क्लबच्या माध्यमातून तरुण युवक युवती मध्ये पर्यटन व्यवसाय संस्कृती वारसा विषयक जागरुकता निर्माण व्हावी. पर्यावरणाविषयी प्रेम निर्माण व्हावं. हा मुख्य हेतू ठेऊन यंदाचा जागतिक पर्यटन दिन साजरा करण्याची भूमिका पर्यटन व्यावसायिक महासंघाची असल्याचे श्री विष्णू मोडकर यांनी सांगितले पर्यटन आणि हरित गुंतवणूक ही जागतिक पर्यटन वर्ष २०२३ चि जागतिक थीम असुन या थीम अनुसरून या वर्षीचा 27 सप्टेंबर 23 जागतिक पर्यटन दिन किल्ले सिंधुदुर्ग वर साजरा केला असून यावेळी पर्यावरण संवर्धन मार्गदर्शन तसेच किल्ला परिसर क्लीन एण्ड ड्राइव मोहिम राबविण्यात आली

भारत पर्यटन मंत्रालय अधिकारी श्री भावना शिंदे यांच्या कडे छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव मंदिर असलेल्या किल्ले सिधुदुर्ग वर मंदिर नूतनीकरण तसेच किल्याची डागडुजी,

एैतिहासिक विहीर नष्ट झालेल्या पुरातन वास्तू पुनर्जिवकरणाची भरीव निधी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने उपलब्ध करावा अशी मागणी श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघाने केली यावेळी पर्यटन व्यावसायिक महासंघ तालुका अध्यक्ष श्री अवि सामंत सोशल मीडिया अध्यक्ष श्री किशोर दाभोलकर ,शहर अध्यक्ष श्री मंगेश जावकर श्री रवींद्र खानविलकर श्री रामा चोपडेकर बंदरजेटी अध्यक्ष व माजी नगरसेविका सौ पूजा सरकारे श्री कोयंडे श्री दर्शन वेंगुर्लेकर तसेच पर्यटन व्यावसायिक युवा पर्यटन क्लब सदस्य व पर्यटन व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा