जीर्ण वृक्ष बाजूला न केल्यास आंदोलन – संजू परब
सावंतवाडी :
सावंतवाडी शहरातील घटना दुर्दैवी आहे. जीर्ण वृक्ष पालिकेने कट करावीत, सार्वजानिक बांधकाम विभागानेही लक्ष घालावा, येत्या पंधरा दिवसात कार्यवाही न झाल्यास आंदोलन केलं जाईल असा इशारा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आज दिला.
झाड कोसळून दोघा युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने, बुधवारी सावंतवाडी पालिका मुख्याधिकारी यांना नागरिकांनी जाब विचारला होता. पालिकेला जबाबदार धरण्यात आले होते.
माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी गुरुवारी शिल्पग्राम येथे पत्रकार परिषद आजोजित करून आपली भूमिका स्पष्ट केली.