You are currently viewing विलवडे श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव रविवारी ६ डिसेंबरला

विलवडे श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव रविवारी ६ डिसेंबरला

बांदा :
विलवडे येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव रविवार दिनांक ६ डिसेंबर २०२० रोजी साजरा होणार आहे,या वर्षी कोरोना महामारीमुळे शासनाचे सर्व नियम पाळून हा जत्रोत्सव साजरा केला जाणार आहे.

कोव्हीड१९ चे सर्व नियम पाळून रात्री मामा मोचेमाडकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग होणार आहे. तसेच भाविकांना सोशल डिस्टन्सिग पाळून रांगेत दर्शन मिळणार आहे,सर्व भाविक भक्तांनी शासनाच्या नियमांचे पालन करून देवीचे दर्शन घ्यावे असे आवाहन देवस्थान कमिटी अध्यक्ष बाळकृष्ण दळवी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा