You are currently viewing मोती तलावात नव्याने २५ हजार राहू-कटला जातीचे  सोडले मत्सबीज

मोती तलावात नव्याने २५ हजार राहू-कटला जातीचे  सोडले मत्सबीज

मोती तलावात नव्याने २५ हजार राहू-कटला जातीचे  सोडले मत्सबीज

सावंतवाडी

येथील मोती तलावात पालिकेकडूून आज शेवाळ खाणाऱ्या राहू-कटला जातीच्या माश्याचे तब्बल २५ हजार मत्सबीज सोडण्यात आले. यासाठी मंत्री दीपक केसरकर यांनी सिंधुरत्न या योजनेमधून निधी उपलब्ध करून दिला आहे. मागच्यावेळी तलावात केलेल्या मासेमारीत पालिकेला ८ लाखाचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. दरम्यान अचानक तलावातील सर्व पाणी सोडण्यात आल्यामुळे पात्रात असलेले मासे निघून गेले होते. मात्र काही दिवसांनी आणखी १ लाख बीज सोडण्यात येणार असल्याची माहिती पालिकेेचे पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी भाऊ भिसे यांनी दिली.

सावंतवाडी मोती तलाव पुर्णतः आटविण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी असलेले मासे पात्राच्या बाहेर गेले होते. तत्पुर्वी तलावात चार ते पाच वेळा करण्यात आलेल्या मासेमारीत ८ लाख रुपये किमतीचे मासे सापडल्याने पालिकेला फायदा झाला होता. दरम्यान सद्यस्थितीत तलाव भरला असला तरी पात्रात मासे नसल्यामुळे मंत्री केसरकर यांनी मुळदे कृषी केद्रांच्या माध्यमातून हे सिंधुरत्न योजनेतून हे मासे उपलब्ध करुन दिले होते. आज ते मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्या उपस्थितीत सोडण्यात आले. आता आणखी काही दिवसांनी आणखी १ लाख मत्सबीज तलावात सोडण्यात येणार आहे, असे श्री. भिसे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा