You are currently viewing ओढा

ओढा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाचे सन्माननीय सदस्य लेखक कवी मुबारक उमरानी लिखित अप्रतिम काव्यरचना*

*ओढा*

ओढ्याच्या काठाची
हिरवी झालरं
शोधत फिरते
चुकार भल्लरं

चिंचा बाभळीची
आगळी सलगी
पाण्यात वाजते
दगडी हलगी

चांदाची प्रतिमा
पाण्यात पळते
चांदणी चांदाची
हसत वळते

वाघाटी दाटीने
मारेते मिठी गं
वेळूच्या बनात
वाजते शिटी गं

पिंपळ सळाळे
हिरव्या पानात
पारंबी बोलते
मासोळी कानात

पाण्यात उभा गं
बगळा तपस्वी
पाण्यात प्रतिमा
हलते तेजस्वी

मासोळी घालीते
पाण्यात हुल्लड
चांदाची छाया गं
लाजते अल्लड

सकाळ होताच
पाखरं बोलती
किरण सोनेरी
पाण्यात डोलती

ओढाभर दिसे
दगड पागोटे
कोणी नेसविले
हो शेलापागोटे ?

©मुबारक उमराणी
सांगली
९७६६०८१०९७.

*संवाद मीडिया*

*प्रवेश देणे चालू आहे !!*

१० वी १२ वी(सायन्स, आर्ट ,कॉमर्स) किंवा ग्रॅज्युएशन नंतर वैद्यकीय क्षेत्रातील शॉर्ट टर्म कोर्स करा आणि शासकीय निमशासकीय हॉस्पिटल व डायग्नोस्टिक सेंटर येथे घडवा आपलं करिअर!

*आरोग्य क्षेत्रात नौकरीची सुवर्ण संधी!!!!!*

*शिकविण्यात येणारे कोर्सेस :-*
💀 *रेडिओलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*
१. एक्सरे टेक्निशियन
2.सी टी स्कॅन
३.एम.आर.आय. टेक्निशियन
४. डी एक्स आय टी
🧪 *पॅथोलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*💉
१.एम.एल.टी
२.डी. एम. एल. टी
३. ऍडव्हान्स डी. एम. एल. टी*

*इतर कोर्सेस :-*
१.ओ.टी टेकनॉलजी.
२. डिप्लोमा इन ओ टी.
३.डायलेसिस टेकनॉलजी
४. डिप्लोमा इन डायलेसिस टेक्नॉलॉजी
५. डिप्लोमा इन इ. सी जी टेक्नॉलॉजी
६. डिप्लोमा इन इ. इ. जी. & इ.एम. जी. टेक्नॉलॉजी
७. नर्सिंग केअर

● *फी मधे आकर्षक सूट*
● *अनुभवी प्रशिक्षक*
● *प्रात्यक्षिकसाठी दवाखान्यात प्रक्षिशण उपलब्धता*

*पत्ता* :-
*उत्कर्ष अकॅडमी ऑफ ग्लोबल करीअर*
*पहिला मजला,देवरुख एस.टी.स्टॅण्ड, देवरुख*रत्नागिरी-४१५८०४*
*मोबाईल- 8369106430/8291348515*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108237/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा