मळेवाड येथे विनापरवाना चिरे वाहतूक करणाऱ्या तीन डंपरवर कारवाई.
सावंतवाडी :
मळेवाड येथे विनापरवाना जांभा दगड (चिरे) वाहतूक करणाऱ्या तीन डंपरवर प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांनी आज कारवाई केली आहे.
मळेवाड, साटेली, सातार्डा, आजगाव, धाकोरा या परिसरात मोठ्या प्रमाणात जांभळा दगडाच्या खाणी आहेत. आज आजगावहून गोव्याच्या दिशेने जांभा दगड (चिरे) वाहतूक करणारे डंपर तपासणी करता प्रांताधिकारी पानवेकर यांनी थांबवून तपासणी केली असता सदरच्या तिन्ही डंपर चालकांकडे जांभा दगड (चिरे) वाहतुकीसाठी लागणारा वाहतूक परवाना नसल्याचे दिसून आल्याने सदरचे तिन्ही डंपर मळेवाड तलाठी अनुजा भास्कर यांना ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या.यानंतरही तिनी डंपर सावंतवाडी तहसीलदार कार्यालयाकडे जमा करण्यात आले.ताब्यात घेतलेल्या तिन्ही डंपरचा पंचनामा आजगाव तलाठी सी नागराज आणि मळेवाड तलाठी अनुजा भास्कर यांनी करून पुढील कारवाई प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाणार आहे.विनापरवाना वाहतूक करणाऱ्या डंपर वर कारवाई केल्याने विनापरवाना जांभा दगड (चिरे) वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.