हरकुळ बुद्रुक मध्ये आगीत दुकान जळून खाक…
कणकवली
तालुक्यातील हरकुळ बुद्रुक येथे काणेकर यांच्या दुकानाला आज पहाटे ४.१५ वाजण्याच्या सुमारास आग लागली. नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांसह स्थानिकांनी ही आग आटोक्यात आणली. मात्र, दुकानातील साहित्य आगीत जळून खाक झाले.
काणेकर यांच्या दुकानाला ४.१५ वाजण्याच्यासुमारास आग लागली. ही बाब रिक्षा व्यावासियकाच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती सरपंच आनंद ठाकूर व शिवसेना उबाठा गटाचे तालुकाप्रमुख डॉ. प्रथमेश सावंत यांना दिली. त्यानंतर लागलीच त्यांनी घटनास्थळी जात ग्रामस्थांच्या मदतीने आग विझविण्यासाठी मदत कार्य चालू केले. डॉ.प्रथमेश सावंत यांनी नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाला फोन केला. काही वेळाने अग्निशामक दलाचे कर्मचारी व बंब घटनास्थळी दाखल झाला. तब्बल दीड तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. घटनास्थळी पोलीसही दाखल झाले होते. ही आग आटोक्यात आणण्यासाठी सरपंच आनंद ठाकूर, आयुब पटेल, तौसीफ पटेल, डॉ.प्रथमेश सावंत, मुकेश सावंत, कुणाल सावंत, राजू पाटील, हमीद पटेल, लियाकत पटेल आसिफ शेख व ग्रामस्थांनी मदत कार्य केले