You are currently viewing स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम

स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम

‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम

सिंधुदुर्गनगरी :

“स्वच्छता ही सेवा” या उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय तसेच परिसरात आज जिल्हाधिकारी किशोर तावडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

यावेळी प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी विशाल खत्री, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, उप मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर, विशाल तनपुरे तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेतील अधिकारी अधिकारी –कर्मचारी उपस्थित होते.

उपक्रमांच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यातनंतर सर्वांनी परिसरात श्रमदानाने स्वच्छता केली. तसेच यावेळी स्वच्छता दौड देखील संपन्न झाली.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्ह्यात 15 सप्टेंबर ते दिनांक 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत स्वच्छता ही सेवा 2023 उपक्रम राबविण्यात येत आहेत. “स्वच्छता ही सेवा २०२३” ची संकल्पना “कचरा मुक्त भारत” ही आहे. यामध्ये दृष्यमान स्वच्छता व सफाई मित्र कल्याण यावरती लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. यावर्षी स्वच्छतेचे उपक्रम राबविणे आवश्यक असून यामध्ये स्वयंस्फुर्तीने श्रमदान करणे गरजेचे आहे. या अभियानात ग्रामीण भागातील बसस्थानके, पर्यटन स्थळे, वारसा स्थळे, नदी किनारे, घाट, नाले आदी ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविली जाणार आहे. तसेच सिंगल युज प्लास्टीक (SUP) वापर व दुष्परिणाम याबाबत गावांमध्ये जनजागृती करणे, शालेय स्तरावर स्वच्छता मोहिम यांचे आयोजन करणे, ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण, कचऱ्यातुन उत्पन्न घेणे, बाजारपेठा व सार्वजनिक ठिकाणी भिंती चित्रे काढणे व कचरा वर्गीकरण पेटया ठेवणे यासारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. स्वच्छतेसाठी युवकांच्या कृतीला चालना देण्यासाठी युवकाच्या नेतृत्वाखाली सर्व गटाना एकत्रित करून स्वच्छतेचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा