You are currently viewing ज्येष्ठा गौरी विसर्जन—

ज्येष्ठा गौरी विसर्जन—

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

 

*ज्येष्ठा गौरी विसर्जन —*

 

 

आधी आले गणपती मागाहून आल्या गौरी. उत्साहाला उधाण आले. घराचा कोपरा कोपरा लख्ख झाला. सजावटींच्या कल्पनांना धुमारे फुटले.अनंत साज चढले.

 

गौरी गणपतीच्या आगमनाने सारे वातावरणच प्रसन्न झाले. कुणी महालक्ष्मी म्हणा ,ज्येष्ठा कनिष्ठा गौरी म्हणा, सारेच भाव पार्वतीला समर्पित. भाद्रपदातील शुक्ल अष्टमीला गौरीने असुरांचा संहार केला. अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी सुवासिनी ज्येष्ठ नक्षत्रावर गौरीची मनोभावे पूजा करतात. म्हणून यांना ज्येष्ठ गौरी असेही म्हणतात.

 

कुणाकडे पितळी मुखवटायच्या गौरी, कुणाकडे नदीतून वेचून आणलेल्या पाच खड्यांच्या देवी, तर कुणाकडे मुळासकटच्या तेरड्याच्या गौरी. कधी त्यावर नटवलेला, सजवलेला कागदी मुखवटा.

 

सारी सौभाग्य लेणी घालून पैठणी अथवा जरीचे वस्त्र नेसवून घरात गौरीची स्थापना केली. तत्पूर्वी उंबरठ्यावरून तिला घरात आणताना तिची सोनपावले हळद-कुंकू वाहून आणि पायसाने पूजिली.

 

तिची विचारपूस करताना तिला विचारावे, गौरबाय गौरबाय कुठून आलीस?”

मग तिने म्हणावे,” घाटावरून.”

मग तिला पुन्हा विचारावे,” काय आणलेस?”

तिने म्हणावे,” धन, धान्य ,आरोग्य, सुख, संपदा, वैभव सगळं घेऊन आले.”

तिला घरभर फिरवावे आणि तिच्यासाठी तिचे माहेर घर सजवलेले तिला दाखवावे.

 

माहेरवाशीण ना ती? तीन दिवसांचीच पाहुणी. मग तिचा गौरव यथा सांग, मनोभावे नको का व्हायला?

दुसऱ्या दिवशी पुरणपोळी, सोळा भाज्या, सोळा चटण्या, सोळा कोशिंबिरी असा षोडषयुक्त आहाराचा तिला नैवेद्य दाखवला. सोळा गाठींचा दोरा तिला वाहिला.आरतीचा गजर झाला. रात्रीचा जागर झाला. झिम्मा, फुगड्या,घागरी फुंकायला सख्या जमल्या. घरामध्ये भक्तीरसातले सूर निनादले. उत्साह, आनंद याला उधाण आले.

 

तिसरा दिवस आला तिच्या पाठवणीचा. मन उदास झाले. तिची ती तेज:पूंज मूर्ती किती पाहू नि किती नको असेच झाले. घरातल्या सुवासिनींनी तिला वाहिलेले दोरे भक्ती भावाने गळ्यात घातले. खीर कानवल्याचा नैवेद्य दाखवला. खण, नारळ, धान्याची ओंजळ, खारीक बदामाने यथाशक्ती तिची ओटी भरून तिची पाठवणी केली. तिचे विसर्जन करून परतताना नदीतून थोडी माती, रेती आणून तिच्या रिकाम्या झालेल्या आसनावर ठेवली. अजूनही ती आपल्या घरात आहे या भावनेला जपण्यासाठी.

 

किती सुंदर गेले हे तीन दिवस! भयमुक्त,ताणविरहीत, चिंतामुक्त. खूप आनंद देणारे, उत्साह वाढवणारे असे हे दिवस! यानिमित्ताने सारा पांगलेला परिवार जमला. पुन्हा पुन्हा नात्यांच्या गाठी बांधल्या गेल्या. तुटलेले संवाद, मोडलेली मनं गौरीच्या साक्षीने पुन्हा जोडली.तेव्हां जाणवले,या सोहळ्यातले सारेच विधी किती रुपकात्मक आहेत! सोळा गाठींचा दोरा,परस्परांच्या नात्यांच्या गाठी मजबूत करतात. सोळा हा देवीचा आकडा. सोळा रसांचा समतोल साधणारा हा अंक. एकमेकांसाठी आपण आहोत याचा विश्वास देणारा हा गौरी सोहळा एक सकारात्मक ऊर्जा देतो. ऐहिक,अथवा भौतिक समृद्धी पेक्षा या गौरी मनाला समृद्ध करतात. बंधू भावाचा अविष्कार करतात. सकारात्मक विचारांचे वैभव देऊन जातात.

 

अशा परंपरा, अशी व्रतं, असे सोहळे याविषयीचे समज गैरसमज दूर ठेवून आपण जर या संकल्पनेच्या मूळ गाभ्यापाशी आलो की वाटते मानवी जीवनात यांचे महत्त्व अनमोल आहे.

 

गौरीचे आगमन ते विसर्जन या तीन दिवसांच्या काळात एकत्रिकरण, जोडणं, कुटुंब संस्थेचं महत्त्व, नात्यांची जपणूक हे जाणलं जातं.आपले सगळेच सण हे मिळूनमिसळून करण्याचे आहेत.सर्वधर्म,जात, वर्णसमावेषक आहेत. नको शत्रुत्व,नको भांडणे,युद्धे, नको वैरभाव. एक मैत्रीचा धागा सारं विश्व जोडण्यासाठी पुरेसा आहे..*वसुधैव कुटुंबकम* हाच जगण्याचा मंत्र हवा. LIVE

AND LET LIVE…BE HAPPY MAKE OTHERS HAPPY हेच सांगतात.

 

” गौराई! तू आलीस, तू गेलीस. येणारा एक दिवस जाणारच असतो हा सिद्धांतही तू जाताना देऊन गेलीस. पण आपल्या या वास्तव्यात जीवनात आनंद कसा निर्माण करावा हा भाव मंत्र देऊन गेलीस. मी तुझी खूप आभारी आहे आणि पुढच्या वर्षीच्या तुझ्या आगमनासाठी अपार उत्सुक आहे. तुझ्या तीन दिवसांच्या या वास्तव्याने मला खूप ऊर्जा मिळालेली आहे. विश्वाच्या अंतापर्यंत तू अशीच येत जा…

 

*राधिका भांडारकर*

 

*संवाद मिडिया*

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण (Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

*Advt Link👇*

————————————————–

📝 *प्रवेश सुरु!* *प्रवेश सुरु!*📝

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण ( Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

👉 Ju Kg ते आठवी वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी जेवण 🍛व क्लासची एकत्रित सुविधा 📚👩🏻‍💻

 

(होमवर्क तसेच Grammer इत्यादीचा परिपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट)📑

 

👉 TV, Mobile यापासून दूर ठेऊन मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेशीत

 

⏰ *वेळ: सकाळी 10 ते 5:30 पर्यंत*

 

👉 (मिलाग्रीस हायस्कूल मधील मुलांना पिकअप करण्याची सोय आहे)

 

*पत्ता:* बाबा फर्नांडिस F – 122, बांदेकर मेस समोर, मिलाग्रीस हायस्कूल नजिक, सालईवाडा, सावंतवाडी

 

📱 *संपर्क:*

सौ.सरोज राऊळ मो.नं: 8983757132

सौ.सुरेखा बोंद्रे मो. नं: 8975257453

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा