You are currently viewing ओटवणे चाकरमानी ग्रामस्थ मंडळ “रौप्य महोत्सव” साजरा करणार…

ओटवणे चाकरमानी ग्रामस्थ मंडळ “रौप्य महोत्सव” साजरा करणार…

ओटवणे चाकरमानी ग्रामस्थ मंडळ “रौप्य महोत्सव” साजरा करणार…

सावंतवाडी

ओटवणे गावातील चाकरमान्यांच्या ग्रामस्थ मंडळ (मुंबई) ने यावर्षी रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. मंडळाच्या या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून याचा शुभारंभ मंडळाच्या दिनदर्शिकेने तर समारोप मंडळाची स्मरणिका प्रकाशित करून करण्यात येणार आहे. मंडळाच्या ओटवणे येथे झालेल्या बैठकीत याबाबतचे नियोजन करण्यात आले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत, सरचिटणीस रामचंद्र गांवकर, कार्याध्यक्ष गणपत गांवकर, सदस्य गोविंद नाईक, महेंद्र गावकर, उमेश गावकर, मंडळाचे ओटवणे गावातील समन्वयक दशरथ गावकर, ओटवणे शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष बाबाजी गावकर, मिलिंद गावकर, सत्यवान गावकर, अनंत गावकर, प्रकाश गावकर आदी उपस्थित होते.
ओटवणे ग्रामस्थ मंडळाची स्थापना १९९९ साली करण्यात आली.
मुंबई स्थित ग्रामस्थांना आधारवड असलेल्या ओटवणे ग्रामस्थ मंडळाने गावच्या शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातही योगदान दिलेले आहे. या मंडळाच्या माध्यमातून गावातील चाकरमानी संघटीत झाले असून मंडळाच्या या कार्यात आजपर्यंतच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपले योगदान दिले आहे. या मंडळाच्या मुंबई येथील वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांसह चाकरमान्यांचा गौरव करण्यात येतो. तसेच दरवर्षी जेष्ठ ग्रामस्थ एका चाकरमान्याचा सन्मान करण्यात येतो. गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचाही दरवर्षी गौरव करण्यात येतो.
मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षातील उपक्रमांचा शुभारंभ दिनदर्शिका प्रकाशित करून करण्यात येणार आहे. याबाबतचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर मंडळामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. तर रौप्य महोत्सवी वर्षाचा समारोप स्मरणिका प्रकाशित करून करण्यात येणार आहे. या स्मरणिकेत मंडळाच्या स्थापनेपासून पंचवीस वर्षातील कार्याचा आढावा घेऊन मंडळाच्या कार्यात योगदान दिलेल्या पदाधिकाऱ्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा