You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीवरील मच्छिमार वस्ती असलेल्या शाळा दत्तक घेणार

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीवरील मच्छिमार वस्ती असलेल्या शाळा दत्तक घेणार

श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष,गाबीत फिशरमेन फेडरेशन

 

 

राज्यातील शासकीय शाळा दत्तक देण्याच्या निर्णयास मान्यता राज्यसरकारने दिली असून शैक्षणिक गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळणेसाठी राज्यसरकार प्रयत्नशील आहे केंद्र सरकार 2020 धोरणा नुसार लोकसहभाग घेण्याचे नमूद केले आहे. या माध्यमातून दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था कॉर्पोरेट ग्रुप यांच्या माध्यमातुन गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण प्रसारासाठी शाळा दत्तक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीवर मच्छिमार व्यावसायिक शिक्षण व शैक्षणिक शिक्षण देण्यासाठी मत्सव्यवसाय शाळा अस्तित्वात होत्या. त्या शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागामार्फ़त चालविल्या जात होत्या. त्या माध्यमातून मच्छिमार समाजातील मुलांना शालेय शिक्षणा सोबत मच्छिमारी व्यावसायिक शिक्षण दिले जात होते. त्यामुळे बाल जीवनातील शिक्षण पद्धती चा उपयोग होऊन सदर विद्यार्थी मोठेपणी व्यावहारिक जीवनात व्यावसायिक क्षेत्रात प्रगती करताना त्याचा लाभ झाला. परंतु शासनाच्या धोरणानुसार किनारपट्टीच्या शाळा जिल्हापरिषद कडे वर्ग झाल्या व त्याच बरोबर सदर शाळेत मच्छिमार समाजाला मिळणारे व्यावसायिक शिक्षण पूर्ण पणे बंद झाले. त्यामुळे या मच्छिमार समाजाच्या युवा पिढीवर त्याचा दूरगामी परिणाम झाला.

या सर्वाचा विचार करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, देवगड, वेंगुर्ला तालुक्याबरोबर मच्छिमार समाजाची मुले शिक्षण घेत असून अशा शाळा गाबीत फिशरमेन फेडरेशन दत्तक घेण्यासाठी शासनास प्रस्ताव सादर करणार असून जिल्हास्तरावर सदर शाळाची यादी शाळेची सद्यस्थिती यांची माहिती घेऊन शाळा निहाय दत्तक घेण्याचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. आज शालेय विध्यार्थ्यांना दर्जेदार शालेय शिक्षणाबरोबर मासेमारी क्षेत्रातील व्यावसायिक शिक्षण, नोकरी व व्यावसायिक संधी शिक्षण पद्धतीवर काम होणे गरजेचे असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 121 किमी पसरलेल्या किनारपट्टीवरील 25000 कुटूंबातील विद्यार्थी वर्गाला या शासन निर्णया चा शैक्षणिक दर्जा व गुणवत्ता सुधारण्यासाठी गाबीत फिशरमेन फेडरेशन कार्य करणार असून शिक्षणा सोबत मासेमारी क्षेत्रातील व्यावसायिक शिक्षण, क्रीडा, आरोग्य, कौशल्य विकास, स्वच्छता, आधुनिक तंत्रज्ञान वापर शालेय शिक्षण पद्धतीत राबवण्यासाठी कटिबद्ध असल्याची माहिती श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष गाबीत फिशरमेन फेडरेशन यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा