*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री वंदना पाटकरी लिखित अप्रतिम लेख*
*निसर्ग एक गुरू*
*****************
, *निसर्गाकडून शिकू*
*लाखो आहेत गुरु*
खरोखर, निसर्ग एक मार्गदर्शक गुरु आहे. आपल्या अवतीभवती अफाट निसर्ग पसरलेला आहे .डोंगर झाडे-झुडपे ,दऱ्या नदी-नाले ,पशुपक्षी या सर्व घटकांमधील सौंदर्य आपल्या डोळ्यांनी व मनांनी किती टिपावे असे मला वाटते . उघड्या डोळ्यांनी आपण जर या गुरूकडे पाहिले तर आपल्याला हे गुरु अनेक कला शिकवत असतो. झाडांच्या वेगवेगळ्या आकारांमध्ये शिल्पे दडलेली आहेत. या आकारातून आपल्याला विविध *मूल्यांची शिकवण* होते .फुला -फुलांचे नवनवे सतेज रंग व इंद्रधनुष्याची कमान व यातील विविध रंग *चित्रकलेचे धडे* देतात .
आपल्या जीवनी सुद्धा वेगवेगळ्या रंगांचे मूल्य ,महत्त्व आपल्याला निसर्ग शिकवतो . निसर्गातील पक्ष्यांचा किलबिलाट यामधून व झऱ्याच्या झुळझुळ वाहण्यातून संगीत कला शिकता येते .कोकिळेची कुहूकुहू मंजुळ ध्वनी *आपल्याला संगीत* शिकवते. मोराच्या नृत्यामधून आपल्याला *नृत्यकला उमजते*. लखलखत्या ताऱ्या मधून दिव्य तेजाची ओळख होते.
डोंगरा कडून आपण आढळपणा शिकावा. निसर्ग बद्दल अनेक भाव-भावनांचा संगम प्रत्ययास येतो. प्रत्येक पावलावर निसर्ग काही ना काही कला आपल्यात रुजवत असतो. त्यासाठी आपण निसर्गाच्या सानिध्यात राहायला हवे. कलेसाठी उपासनेसाठी लागणारे साहित्य आपल्याला निसर्ग पुरवतो. निसर्गाचे जे मधुर गाणे आहे त्याने मला जीवन कसे जगावे हे शिकवले. नेहमी आनंदाने व सौंदर्यपूर्ण जगायला शिकवले. जगासाठी काहीतरी परोपकार करावा हया *जीवन मूल्यांची* शिकवण मला दिली.
निसर्गातले *लाखो घटक आपले उत्तम मार्गदर्शक गुरु आहेत* सूर्य आपल्याला शिस्त शिकवतो .दुसऱ्याला प्रकाश देण्याचा धडा देतो .चंद्र -चांदण्या *शितलचा शिकवतात*. पाण्याने भरलेला ढग *उदारता शिकवतो* डोंगर आपल्याला संकटात अविरत *अविचल राहण्याची शिकवण* देतो. हिरवीगार झाडे आपले जीवन कसे बहरावे याचा संदेश देतात. झाडे सुद्धा माणसांना फळे-फुले, पाणी व सावली देतात .यासाठी यातून
*दुसऱ्यासाठी घाव सोसणे* निस्वार्थी सेवेचा मंत्र देतात.
सृष्टीचे गाणारे भाट म्हणजेच पशुपक्षी आपल्याला मुक्तता व स्वातंत्र्याचा धडा देतात.आकाशात चमकणारा तेजस्वी चंद्र व लुकलुकणारे चांदणे त्यांनी मला जगणे शिकवले . या जगात संस्काराची जाणीव मला त्यांनी करून दिली. समुद्राची विशालता दुसऱ्यासाठी कितीही संकटे आली तरी डगमगायचे नाही हे मूल्य शिकवतो . हे मला समुद्राने व झाडांनी शिकवले. नदी समुद्रात विलीन होते ती समुद्रावरून जीव ओवाळून टाकते. त्याला समर्पित होते. प्रेमापोटी नदीचे सागराला मिळण्यासाठी स्वच्छंदी धावणेमला जगायचे कसे शिकून गेले .सर्वधर्मसमभाव, परोपकारीता, दुसऱ्यांसाठी जगणे, विविध कलागुण ,या सगळ्या गोष्टी निसर्गाकडून आपल्याला मिळालेली देणगी आहे म्हणूनच मी म्हणेन की
*निसर्ग हा एक उत्तम मार्गदर्शक व गुरू आहे* गुरु प्रमाणे निसर्ग आयुष्यभरआपल्याला काहीना काही देतच असतो आपण त्याचा नेहमी आनंदाने स्वीकार करत असतो . निसर्गातील विविध घटक आपल्यावर संस्कार करतात व काही निरंतर मूल्यांची शिकवण देतात निसर्गातील या घटकांकडून काय काय शिकता येईल व आपणही त्याचे काही देणे लागतो . *निसर्ग हा फार मोठा गुरु आहे*.असे मी म्हणेन निसर्गातील लाखो घटक आपले उत्तम शिक्षण देणारे गुरु व मार्गदर्शक आहेत .
शेवटी मी एवढेच म्हणेल की निसर्गाने आपल्याला जी अमूल्य भेट दिली आहे त्याचा जपून वापर करू या निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. अनेक संकटे ओढवत आहेत. त्या साठी निसर्ग आणि मानव हातात हात घालून चालले पाहिजे
*रंगांची विविध संगती*
**जोडा या गुरूंची नाती*
*या दिव्यदृष्टी जतन करू या सृष्टि*
या गुरूंची अमूल्य शिकवण साठवू मनी. शिकुन घेऊया नवनवीन तराने …….
*****************
लेखांकन …
सौ. वंदना राजेंद्र गवळे
शिक्षिका
डॉ विजयराव व्ही इंग्लिश मेडीयम स्कूल
शिरपूर जि. धुळे.
*****************
*संवाद मिडिया*
👩👩👧👦 *मुक्तांगण (Day Care Centre + Classes)*👩👩👧👦
*Advt Link👇*
————————————————–
📝 *प्रवेश सुरु!* *प्रवेश सुरु!*📝
👩👩👧👦 *मुक्तांगण ( Day Care Centre + Classes)*👩👩👧👦
👉 Ju Kg ते आठवी वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी जेवण 🍛व क्लासची एकत्रित सुविधा 📚👩🏻💻
(होमवर्क तसेच Grammer इत्यादीचा परिपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट)📑
👉 TV, Mobile यापासून दूर ठेऊन मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेशीत
⏰ *वेळ: सकाळी 10 ते 5:30 पर्यंत*
👉 (मिलाग्रीस हायस्कूल मधील मुलांना पिकअप करण्याची सोय आहे)
*पत्ता:* बाबा फर्नांडिस F – 122, बांदेकर मेस समोर, मिलाग्रीस हायस्कूल नजिक, सालईवाडा, सावंतवाडी
📱 *संपर्क:*
सौ.सरोज राऊळ मो.नं: 8983757132
सौ.सुरेखा बोंद्रे मो. नं: 8975257453
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————-
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*