You are currently viewing ओटवणेत अंगणात लावलेली पल्सर आगीत भस्मसात.

ओटवणेत अंगणात लावलेली पल्सर आगीत भस्मसात.

ओटवणेत अंगणात लावलेली पल्सर आगीत भस्मसात.

सावंतवाडी

ओटवणे मांडवफातरवाडी येथे इन्सुली येथील दत्ताराम गावडे यांनी साबाजी बिले यांच्या अंगणात लावलेली पल्सर टू ट्वेन्टी (MH 05cn6424) नंबरची दुचाकी गाडी आगीत जळून खाक झाली. ही गाडी गावडे यांनी आपल्या पाहुण्याच्या घरी अंगणात उभी करुन ठेवली होती. गाडीच्या वायरिंग शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे अचानक गाडीने पेट घेतल्यावर गाडीतील पेट्रोल ने ही पेट घेतल्याने आगीने रौद्ररूप धारण केले ही आग विझविण्याचा शेजाऱ्यांनी आटोकाट प्रयत्न केला मात्र आगीचे प्रमाण येवढे होते की आग नियंत्रणाबाहेर गेली. गाडीच्या बाजूलाच असणाऱ्या वीज मीटर पर्यंत आग पोचली होती मात्र सुदैवाने वीज कनेक्शन ने पेट घेतला नाही नाहीतर मोठा अनर्थ घडला असता यात दुचाकी मालकाचे लाखो रुपयांचे मोठे नुकसान झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा