जटिल प्रश्न
का दूषणं देतेस तू आपुल्या उदराला?
पदराने तर तू डोळे तयांचे पुसले होते.
का चटके देतेस तू तुझीया हृदयाला?
नेत्र तयांचे तुझंवर आजही रुसले होते.
का अर्धपोटी राहूनही तू पोट तयांचे भरले?
त्याग तुझा आजही ते सहजच विसरले होते.
काय असतं आयुष्यात स्वतःच्या हक्काचे?
आपल्यांनीच आपले हक्क ओरबाडून घेतले होते.
का जन्म देतात माता त्या तान्हुल्याना?
जे कधी फिरून तिच्या समोरच प्रश्न बनले होते,,,???
समोर प्रश्न बनले होते….???
दिपी…!!!
९४२१२३७५६८