You are currently viewing गाडीवरील ताबा सुटल्याने भोमवाडी येथे अपघात

गाडीवरील ताबा सुटल्याने भोमवाडी येथे अपघात

दोडामार्ग
साटेली भेडशी भोमवाडी येथील तिराळी धरणाच्या कालव्यावर अपघात घडला. तिलारी धरण कालव्याच्या अरुंद रस्त्यावरून एक कार चालक आपली कार घेऊन जात असताना अरुंद रस्त्याचा अंदाज न आल्याने गाडीवरील ताबा सुटून सदर कार सरळ कालव्यात कोसळली. मात्र कार चालक केवळ दैव बलवत्तर म्हणून वाचल्याची माहिती घटनास्थळावरून मिळते आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,कार चालक आपल्या ताब्यातील इनोव्हा कार घेऊन (G A 07 -7117)या कालव्यावरून जात असताना कारवरील ताबा सुटल्याने कार कालव्यात कोसळली व पलटी झाली यावेळी प्रसंगावधान राखून गाडीच्या काचा फोडून चालक बाहेर आल्याने वाचला.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही कार जैन या व्यक्तीची असून सदर कार पाण्यातुन बाहेर काढण्यात आली

प्रतिक्रिया व्यक्त करा