You are currently viewing अशी मी लेखणी

अशी मी लेखणी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य लेखिका कवयित्री वंदना पाटकरी लिखित अप्रतिम लेख*

 

*अशी मी लेखणी*
✍️✍️✍️✍️✍️

 

*अलगद अक्षरे,शब्द*
*भरभर कागदावरी*
*कणाकणांनी मी लिहिते*
*मुक्या भावना रचनावरी*

हो मी आहे लेखणी! मलाही आज माझे विचार मांडायचे आहे. अशी संधी मला परत कधी मिळणार? कोणताही भेदभाव मी करत नाही. गरीब, श्रीमंत, लहान, मोठा , रंक असो की राजा कोणाच्याही हाती मी गेले की, मी माझे काम निकोप पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत असते .माझ्या अंतरी कुठलाही गर्व नाही. पूर्वीपासून विचार केला तर थोर संत , ज्ञानी यांनी माझ्या मदतीने अनेक ग्रंथ अभंग भारुडे ओव्या रचना साहित्य लिहिली गेली. तेव्हा मला माझ्या जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटले. जेव्हा मी थोर ज्ञानी विद्वान पंडित यांच्या हाती जाते तेव्हा मला स्वर्ग मय आनंद होतो. पूर्वीच्या काळापासून माझा वापर केला जात आहे. परंतु माझ्या रुपामध्ये बदलत्या काळाप्रमाणे बदल होत गेले परंतु माझा स्वभाव मात्र बदलला नाही .तुम्ही माझा जसा वापर करणार तशी मी तुम्हाला लिहिण्याचा मदत करत असते .

तुमच्या मनातील ज्याही भावना असतील त्या मी भरभर कागदावर उतरवत असते. मी जर विद्यार्थ्यांच्या हातात गेले तर विद्यार्थ्यांचे विचार त्यांच्या वहीमध्ये अचूक नोंदवत असते. पण लिहिताना जर चुका होत असतील त्यात माझा दोष नाही. जेव्हा विद्यार्थी पेपर देतात तेव्हा त्यांच्या मनातील विचार मी पेपरामध्ये मांडत असते. त्यावरूनच तर विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य समजते. जेव्हा मी एखाद्या व्यापारी माणसांच्या हातात जाते तेव्हा मी हिशोबाच्या वहीमध्ये चूक माझे काम करते पण लिहिताना जर हिशोब चुकला त्यात माझा दोष नाही. हिशोब लिहिण्याचे काम मी अचूक करते. माझ्यामुळे व्यापारी माणसे हिशोब माझ्याच मदतीने लक्षात घेत ठेवत असतात.
*रंग माझा वेगळा*
*काम करते छान*
*सर्वांसाठी झिजते*
*याने मिळतो मान*

अहो! एवढेच काय एवढेच काय जेव्हा मी सैनिकाच्या हातात जाते तेव्हा मातृभूमीसाठी घरदार सोडून सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या परिवाराला बातमी देण्याचे काम माझ्या मार्फतच होते. तेव्हा मला माझा खूप अभिमान वाटतो. जेव्हा मी एखाद्या पत्रकार व्यक्तीचा हाती जाते तेव्हा तळागाळातील आनंदाच्या , दुःखाच्या आणि विविध बातम्या सुखदुःखाच्या बातम्या पत्रकार माझ्याच मदतीने मांडण्याचा प्रयत्न करतात.
मी जेव्हा लेखकाच्या हाती जाते तेव्हा त्याच्या मनातले अप्रतिम विचार अलंकारिक भाषा नव नवीन माहिती सृजनशीलता व्यासंगी लेखन दिव्य अनुभूती विविध कथा पटकथा संवाद माझ्याच मदतीने लिहिले जातात. साहित्य निर्मितीसाठी माझा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. म्हणतात ना मनामनांतले पानापानांत !!!जेव्हा मी एखाद्या कवी किंवा कवयित्रीच्या हाती जाते तेव्हा मला अत्यानंद होतो . माझ्यामध्ये वेगळेपणा मला जाणवत असते. कवीने केलेली रचना काव्य फुले विविध रूपामध्ये लिहिताना माझे भान हरवून जाते. तेव्हा एक वेगळेपण जाणवते अनेक अलंकारिक शब्द मला पाहायला मिळतात .त्यातून कवीने पानावर मांडलेली आपली रचना जेव्हा माझ्या मदतीने पूर्ण होते तेव्हा कवीच्या मनातला आनंद मला मोहित करत असतो. मला जणू काही सवय जडली आहे अशा पद्धतीने मी कवी मनाला साथ देत असते.

मी ज्यांच्या ज्यांच्या हाती जाते त्यांच्या हाती अचूक काम करण्याचा प्रयत्न करते. लिहिणाऱ्यांनी जर चुका केल्या तर त्यात माझा काही दोष नसतो .काही कवींनी माझ्यावर छान छान कविता सुद्धा केलेल्या आहेत. त्या वाचून मला अपार आनंद होतो मी जेव्हा काव्यातून बहर असते तेव्हा काव्यातील कवीच्या मनातील विचारांनी मी भारून जाते…
*अशीच आहे मी*
*नाजूक लेखणी*
*तुमची मदत*
*करते देखणी*
✍️✍️✍️✍️✍️

लेखांकन ……
*सौ. वंदना राजेंद्र गवळे*
शिक्षिका डॉ विजयराव व्ही रंधे इंग्लिश मेडीयम स्कूल शिरपूर
मु.पो. शिरपूर धुळे.

 

*संवाद मिडिया*

 

*गुरुजनांसाठी हिरो ची खास ऑफर..*

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

 

💥 *शिक्षकदिन विशेष ऑफर* 💥

 

खास आपल्या गुरुजनांसाठी हिरो वाहन खरेदीवर खास सवलत 😇😇

 

HF DLX/SPLENDOR/PASSION सिरीझ वर रुपये 2000/-

 

SUPER SPLENDOR/GLAMOUR सिरीझ वर रुपये 2500/-

 

SCOOTER/PREMIUM सिरीझ वर रुपये 3000/-

 

दिनांक 20/09/2023 पर्यंत 🗓️

 

आजच बुक करा..📝

 

🎴मुलराज हिरो, एम.आय.डी.सी. कुडाळ

 

📱9289922336 / 7666212339

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा