मद्य पिवून दुचाकी चालविले प्रकरणी न्यायालयाने ठोठावला १० हजार रुपयांचा दंड
पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची माहिती..
मालवण
मद्य पिऊन दुचाकी चालविल्या प्रकरणी चालक संदीप संतोष थोरात याला येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले असता १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.
आज त्याला न्यायालयात हजर केले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्यानुसार न्यायालयाने त्याला दहा हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास पंधरा दिवस साधा कारावास व तीन महिन्यांसाठी दुचाकी वाहन परवाना रद्द अशी शिक्षा ठोठावली असल्याची माहितीही श्री. कोल्हे यांनी दिली.
दोन दिवसांपूर्वी ट्रिपल सीट वाहन चालवीत असताना भरड नाका येथे वाहतूक पोलीस कर्मचारी गुरुप्रसाद परब यांनी शिटी मार वाहन थांबविण्यास सांगितले. मात्र दुचाकी चालकाने गाडी तारकर्लीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी तारकर्ली नाका येथे कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी श्री. भोसले यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. यात चालकाला त्यांनी पकडले तर त्याचे अन्य दोन साथीदार पळून गेले. तपासात दुचाकी चालक संदीप थोरात सध्या रा. हॉटेल सी हॉरिझन, भोगवे – वेंगुर्ले हा मद्य पिऊन दुचाकी चालवीत असल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला.