सिंधुदुर्गनगरी
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व मार्गदर्शन केंद्र आणि उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे यांच्या संयुक्त विद्यमाने मत्स्यशेती व शोभिवंत मासे व्यवसाय यावर ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या मार्गदर्शनासाठी डॉ. नितीन सावंत मत्स्यशास्त्रज्ञ उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे हे दि. 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. या ऑनलाईन मार्गदर्शनासाठी स्वयंरोजगार ईच्छूक उमेदवारांनी Meeting URL : https:// meet.google.com/zuf-dauq-hbq या लिंकवर ॲप डाऊनलोड करुन स्वयंरोजगार समुपदेशन सत्रास उपस्थित रहावे, अधिक माहितीसाठी 02362-228835 किंवा 9403350689 या दूरध्वनी व भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.