You are currently viewing श्री विष्णू सुकाजी सातार्डेकर यांचे हृदयविकाराने निधन…

श्री विष्णू सुकाजी सातार्डेकर यांचे हृदयविकाराने निधन…

बांदा येथील प्रतिष्ठित व्यापारी श्री.विष्णू सुकाजी सातार्डेकर यांचे हृदयविकाराने निधन..

बांदा प्रतिनिधी :-

काळसेवाडी येथील प्रतिष्ठित व्यापारी श्री.विष्णू सुकाजी सातार्डेकर, यांचे आज दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान सावंतवाडी येथे हॉस्पिटलमध्ये नेत असताना वाटेतच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. आज सकाळी उठल्यावर त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे उपचारासाठी त्यांना सावंतवाडीत हलविण्यात येत होते.
अण्णा या नावाने परिचित असलेले विष्णू सातार्डेकर गेली अनेक वर्षे काळसेवाडी बांदा येथील बांदेश्वर मंदिर समोर जनरल स्टोअर्स चालवीत होते. वृद्धापकाळाने गेले काही महिने त्यांनी दुकान बंद ठेवले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे विपीनचंद्र (दाजी) व वीरेंद्र आणि दोन विवाहित मुली आहेत. दोन्ही मुलगे इंजिनिअर असून नोकरीनिमित्त बाहेरगावी असतात, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा मुलगा गेले तीन महिने गावीच होता. बांदा येथील सहदेव सातार्डेकर यांचे ते बंधू होत. आज रात्री उशिरा छोटा मुलगा आल्यानंतर बांदा येथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen + one =