जल सर्वेक्षणासाठी मासेमारी बंद
मत्स्य व्यवसाय परवाना अधिकाऱ्यांची माहिती ; अधिकारी, मत्स्य संस्थांच्या बैठकीत निर्णय
मालवण
भारतीय नौदल यांच्यामार्फत कवडा रॉक ते देवबाग मोबार या समुद्री क्षेत्रात १० ते १५ वाव मध्ये जल सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या जल सर्वेक्षणासाठी १५ ते १७ सप्टेंबर या काळात सकाळी सात ते सायंकाळी सात यावेळेत तर १८ ते २१ सप्टेंबर या काळात २४ तास मासेमारी बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत अशी माहिती सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाचे परवाना अधिकारी यांनी दिली.
तहसील कार्यालयात शुक्रवारी तहसीलदारांच्या उपस्थितीत मत्स्य सहकारी संस्था अध्यक्ष व प्रतिनिधी यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. त्यानुसार मत्स्यव्यवसायिकांचे म्हणणे लक्षात घेत जल सर्वेक्षणासाठी निश्चित केलेल्या तारखेच्या काळात मासेमारी बंद ठेवण्याच्या सूचना तहसीलदार, पोलीस निरीक्षक व नौदल अधिकाऱ्यांनी दिल्या.