You are currently viewing मळेवाड येथे ३० एप्रिल पासून भव्य ग्राम सांस्कृतिक महोत्सव

मळेवाड येथे ३० एप्रिल पासून भव्य ग्राम सांस्कृतिक महोत्सव

ग्रामपंचायत व युवा मित्रमंडळाचे आयोजन

सावंतवाडी

ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे यांच्या सहकार्याने व युवा मित्र मंडळ मळेवाड कोंडूरे आयोजित ३० एप्रिल ते ४ मे असा भव्य ग्राम सांस्कृतिक महोत्सव २०२२ आयोजीत केला आहे. या महोत्सवातील कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत. पहिला दिवस ३० एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता श्री सत्यनारायण पूजा व तीर्थप्रसाद संध्याकाळी ३ ते ६ महिला व मुलांसाठी फनी गेम व महीलासाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम.

रात्री ७ वाजता निमंत्रित भजन मंडळांचा कार्यक्रम दुसरा दिवस १ मे सकाळी आठ वाजता रक्तदान शिबिर रात्री नऊ वाजता शिर्डी माझे पंढरपुर दशावतारी नाट्यप्रयोग. तिसरा दिवस २ मे रात्री नऊ वाजता सांस्कृतिक महोत्सवाचा शुभारंभ रेकॉर्ड डान्स स्पर्धा वेशभूषा स्पर्धा व महिलांचा नाट्यप्रयोग तर चौथा दिवस ३ मे रात्री नऊ वाजता ऑर्केस्ट्रा पाचवा दिवस तसेच ४ मे युवतींची कोकण सुंदरी २०२२ ही सौंदर्य स्पर्धा तसेच लहान मुलांचा फॅशन शो होणारं आहे.
तरी या महोत्सवाचा रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच मिलन पार्सेकर व उपसरपंच तथा मंडळाचे अध्यक्ष हेमंत मराठे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा