धामापूर येथे वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई…
मालवण तहसीलदार यांनी मालकाला पाठविली नोटीस
मालवण
मालवण – कुडाळ मार्गावरील धामापूर येथे महसूल पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारा कुडाळ येथील डंपर पकडला. याबाबत डंपर मालक अविनाश यशवंत पंडित (रा. कुडाळ) यांना दंडात्मक कारवाईची नोटीस मालवण तहसीलदारांकडून बजावण्यात पाठविण्यात आली आहे.
मालवण मंडळ अधिकारी यांच्या अनधिकृत गौणखनिज वाहतूक व उत्खनन विरोधी पथकाने बुधवारी सकाळी धामापूर येथे वाळू वाहतूक करणारा एमएच ०७ सी ५८९० या क्रमांकाचा डंपर पकडला. या डंपर मध्ये दोन ब्रास वाळू सापडून आली. तसेच डंपर चालकाकडे गौणखनिज वाहतुकीचा परवाना सापडून आला नाही. त्यामुळे महसूलच्या पथकाने हा डंपर ताब्यात घेत मालवण तहसीलदार कार्यालय येथे आणून ठेवला आहे. याबाबत मालवण तहसीलदारांनी डंपर मालक अविनाश पंडित यांना अनधिकृत वाळू वाहतुकीप्रकरणी दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली आहे.