निविदा उघडल्याने महापालिकेची लाखोंची बचत : शशांक बावचकर
इचलकरंजी : प्रतिनिधी
इचलकरंजी महापालिका प्रशासनाने विविध कामांची निविदा उघडल्याने शासनाच्या लाखो रुपयांची बचत झाली असून यातून मोठी कमाई करण्याचा कारभा-यांचा डाव फसला असल्याची माहिती राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सचिव, माजी नगरसेवक शशांक बावचकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
इचलकरंजी महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत एकूण ८४ कामांची निवीदा मागवण्यात आली होती. या सर्व कामामध्ये कारभारी मंडळींनी प्रशासनावर निविदेतील अटी बदलण्या संदर्भात व स्वतःच्या ठराविक मक्तेदाराना कामे मिळवून देण्याचा व महापालिकेच्या निधिची लूट करण्याचा प्रयत्न चालवला होता.
तथापी मी प्रथमपासूनच या सर्व कामांचा काम नेमकेपणाने होण्यासाठी प्रशासनाकडे पत्र व्यवहार करून व आयुक्तांची समक्ष भेट घेवून पाठपुरावा करीत होतो.असे असले तरी प्रशासनाने या निवीदा कामातील कागदपत्राची छाननी करण पाकीट उघडले ,परंतू दर पत्रकाचे पाकीट उघडले जाऊ नये असा प्रयत्न कारभारी मंडळी करीत होते व सदर कामाची फेर निविदा काढण्याचाही प्रयत्न व दबाव सातत्याने काही राजकीय नेतेमंडळीं कडून आयुक्तांवर आणला जात होता. यामुळे मी दि.६ सप्टेंबर २०२३ रोजी आयुक्तांना तातडीने ८३ कामाचे दर पत्रकाचे लिफाफा क २ उघडण्यात यावा व वरील कामाच्या फेरनिवीदा काढण्याची बाब बेकायदेशीर असल्याचे पत्र दिले होते.
त्यानुसार माझ्या मागणीप्रमाणे माझ्या पत्राची दखल घेवून आयुक्तांकडून वरील ८३ कामाचे लिफाफा क २ उघडण्याचे आदेश देण्यात आले. याप्रमाणे आत्तापर्यंत ८३ पैकी ५७ निवीदा कामाचे लिफाफा क २ उघडल्याचे समजते व यातील सर्वच कामे स्पर्धात्मक दराने भरली गेली असून ५% टक्केपासून २५.३५ % टक्क्यापर्यंत कमी दराच्या निविदा प्राप्त झाल्याचे समजते. त्यामुळे महानगरपालिकेच्या निधीची प्रचंड प्रमाणावर बचत झाल्याचे दिसून येते.
केवळ कारभा-यांच्या हट्टापोटी व महापालिकेच्या निधीवर नजर ठेवून स्वतःचे खिसे भरण्याचा हेतू वरील निवीदाचे लिफाफा क २ उघडल्यामुळे फसला आहे. कारभा-यांच्या या प्रवृत्तीमुळे गेल्या ३ महिन्यांहून अधिक काळ प्रशासनाने वाया घालविला व विलंबाचे खापर विधानसभेत विचारलेल्या प्रश्नामुळे पाकिट उघडण्यास विलंब झाला, असा शेराही संबंधित खात्याने मारला आहे.असे असले तरी माझ्या सात्यतपूर्ण पाठ पुराव्यामुळे महानगरपालिकेला ८३ कामातील निवीदा उघडाव्या लागल्या अन्यथा या कामाचे तीन तेरा वाजवण्याचा मनसुबा कारभारी व त्यांच्या नेत्यांचा होता ,तो पूर्णतः उधळला गेला असल्याचे माजी नगरसेवक शशांक बावचकर यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या शेवटी म्हटले आहे.