संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक यांनी केले मार्गदर्शन
शिवसेना सदस्य नोंदणी अभियान १ ते १५ डिसेंबर २०२० या कालावधीत राबविले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर कुडाळ मालवण तालुक्यातील शिवसेना कार्यकारिणीची बैठक सिंधुदुर्ग संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याबाबत तसेच संघटना बांधणी बाबत अरुण दुधवडकर, आ.वैभव नाईक यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी मालवण येथे माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेवक मंदार केणी, किरण वाळके, तपस्वी मयेकर, पंकज सादये ,मंदार गावडे, सन्मेष परब, किसन मांजरेकर, विजय पालव बाळ महाभोज, श्वेता सावंत,आकांक्षा शिरपुटे ,तृप्ती मयेकर, दर्शना कासवकर, दीपा शिंदे, पूनम चव्हाण, प्रसाद चव्हाण, सेजल परब, शीला गिरकर, आदी उपस्थित होते.
कुडाळ येथे जिल्हाप्रमुख संजय पडते, जि.प गटनेते नागेंद्र परब, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, महिला जिल्हासंघटक जान्हवी सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, शहरप्रमुख संतोष शिरसाट, राजू कविटकर,माजी जि.प.अध्यक्ष विकास कुडाळकर,उपसभापती जयभारत पालव, अतुल बंगे, श्रेया परब, मथुरा राऊळ, स्नेहा दळवी, सुप्रिया मांजरेकर,जिप सदस्य, पंस सदस्य ,विभाग प्रमुख,नगरसेवक, सरपंच उपसरपंच आदींसह शिवसेना युवासेना महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होते.