You are currently viewing भुताखेतांच्या कथा

भुताखेतांच्या कथा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम कथा*

 

*भुताखेतांच्या कथा*

*(भाग 24 वा )*

मित्रहो,

आजपर्यंत 24 कथा सांगून झाल्यात त्या कथांना रसिक वाचकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे त्या बद्दल धन्यवाद.

या सर्व कथा मी स्वतः ऐकलेल्या तसेच प्रत्यक्षात अनुभवलेल्या आहेत. या 24 व्या भागात मी आज प्रत्यक्ष पाहिलेली घटना सांगत आहे. आमचे एक जवळचे वयस्कर नातेवाईक पेशाने शिक्षक होते. त्यांच्याकडे आम्ही काही मुले शिकवणीसाठी विनामूल्य जात होतो. ते काही मंदिरात पूजाही करीत असत. भविष्याचा देखील त्यांचा अभ्यास होता. अर्थार्जन हा त्यांचा हेतू नव्हता . सतत कार्यरत रहाणे ही प्रवृत्ती. आमचे तर नातेच होते त्यामुळे आमचेकडे त्यांचे किंवा त्यांच्याकडे आमचे जाणे येणे असे. आता थकले होते. पण मंदिरात पूजाअर्चा करण्यासाठी त्यांचे जाणे असे हे मी पाहिले होते. एकदिवस अचानक आमच्या घरी सकाळी त्यांच्या घरुनच निरोप आला की ” *नाना* ( गुरुजी ) गेले. तेंव्हा आम्ही सर्वच गावातील नातेवाईक मंडळी त्यांच्या घरी गेलो होतो. सहाजिकच कौटुंबिक नाते असल्यामुळे आमचे सर्वच कुटुंब त्या दुःखद प्रसंगी गेलो होतो. (आम्ही सर्व लहान मुले आतल्या माजघरात बसलो होतो.) लोक जमले, घरी रडारडी झाली नंतर प्रथेप्रमाणे अंगणातील चौकात सर्व विधी करून त्यांना कृष्णा नदीकाठी अग्निही दिला. नदीवरचा अंत्यविधी उरकून सर्व घरी आले देखील. आम्हा मुलांना घरात दुःखद घटना घडली आहे हे जाणवले होते. प्रसंगानुसार शांतता होती. नातेवाईक मंडळी आपआपल्या घरी गेली. आमच्या घरी एकत्र कुटुंब असल्यामुळे घरातील मोठी माणसे “*नानांच्या स्वभावा बद्दल, त्यांच्या आयुष्याबद्दल सहाजिकच जुन्या आठवणींची चर्चा करीत होती.*”
आता तर जवळचेच नाते असल्यामुळे पुढच्या सर्व विधीसाठी आमचे बाहेर गावचे नातेवाईक देखील आमचेकडेच येणार होते. आले देखील..

मी कळण्याएवढा मोठा होतो. बरं मी नानांना चांगले ओळखत होतो. त्यांच्याकडे शिकवणी साठी जात होतो. म्हणजे मी त्यांना विसरणे तर शक्यच नव्हते.

पण तिसरे दिवशी एक आश्चर्यकारक घटना घडली की सकाळी 7 वाजता मी शाळेत चाललो असताना *मला प्रत्यक्षात धोतर नेसलेले, अंगावर पंचा घेतलेले नाना भिक्षुक वेषात मंदिरातून हातात नेहमीची फुलांची परडी घेवून चालत येत आहेत असे दिसले होते..

मलाही आश्चर्य वाटले. पण ही गोष्ट मी माझ्या घरी आल्यावर लगेच माझ्या वडिलांना, काकांना, घरच्यांना सांगितली. त्या सर्वांनाही खूप आश्चर्य वाटले. पण माझ्या सांगण्यावर कुणाचाही विश्वास बसला नाही.

पण नानांच्या घरातील जी वयस्कर मंडळी होती त्यांच्या कानावर ही गोष्ट आमच्या वडिलांनी घातली..त्या लोकांनाही त्याबद्दल आश्चर्य वाटले. परंतु या मी सांगितलेल्या घटनेला नानांची जी मोठी विधवा बहीण होती तिनेही दुजारा देवून सांगितले की हा भास मलाही झाला आहे…..

“*आज पहाटे मागील विहीरिवर नाना अंघोळ करतांना मीही पाहिले आहे.*

पण मुद्दाम कुणाला भीती वाटू नये म्हणून मी काही बोलले नाही…….

असे घडू शकते….कारण *आत्मा* हा अमर आहे..कुणाला दिसेल सांगता येत नाही..या साऱ्या स्वानुभवाच्या गोष्टी आहेत.

*(ही साधारणतः 1960 /62 च्या दरम्यानची आठवण आहे. मला आजही स्मरणात आहे.)*

***********
*#©️वि.ग.सातपुते.*

 

 

*संवाद मिडिया*

 

*महेश सेवा समितीतर्फे ज्येष्ठ नागरीकांचा सत्कार*

 

इचलकरंजी : प्रतिनिधी

 

येथील महेश सेवा समितीच्या वतीने सुवर्णमहोत्सव वर्षानिमित्त ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार प. पू.श्री श्री 1008 जगदगुरु रामानुजाचार्य स्वामी श्रीधराचार्य महाराज यांच्या हस्ते व खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहाने संपन्न झाला…

 

*सविस्तर वाचा👇*

—————————————————

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची – ओंकार ट्रेडर्स*

 

*लिंक वर क्लिक करा 👇*

————————————————–

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇

 

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात..*

 

🌐 https://sanwadmedia.com/105547

 

🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿

 

👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि रिटेलर शॉप

 

👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇

 

👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल.

 

🎴 *ओंकार ट्रेडर्स*

*माणगाव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

 

*प्रो. प्रा. श्रीम. योगिता तामाणेकर*

 

☎️ *संपर्क :* ०२३६२ – २३६२६१

📱 *मो.९४२३३०४७९६,* *७७७४९००५०१,* *९४२१२६१०८९,* *९८३४३४३५४९*

 

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा