You are currently viewing भुतांखेतांच्या कथा

भुतांखेतांच्या कथा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम कथा*

 

*भुतांखेतांच्या कथा*

*( भाग 23 )*

एक सत्य कथा

फार पूर्वीची म्हणजे स्वातंत्रपूर्व काळातील पेशवे कालीन ही कथा आहे . सातारा जिल्ह्यातील वाई या गावी रास्ते वाडा आहे . तेथे कृष्णामाई नदी वाहते ..पूर्वी सर्वत्रच अनेक लोक अनेक श्रद्धेपोटी धार्मिक व्रते करीत असत..

त्याप्रमाणे रास्ते घरण्यातील एक विधवा स्त्री ही नित्यनेमाने पहाटे कृष्णानदीवर स्नानास जात असे . त्याकाळी हल्ली सारखी घड़याळे नव्हती किंवा गजर वगैरे प्रकार नव्हते ..

आकाशातील चंद्र चांदणे , नक्षत्रे पाहुन अंदाजे वेळ कळत असे , समजत असे त्याप्रमाणे वेळ ठरवित असत त्याप्रमाणे दैनंदिन दिनक्रम चालू असे …

शास्त्रानुसार दिनक्रमाचे ३ प्रहर ठरलेले होते . त्यानुसार नदीच्या घाटावर देवयोनी , पिशाच्य योनी व मनुष्य योनी यांच्या स्नानाच्या वेळा ठरलेल्या होत्या .

ब्रह्ममुहूर्तावर माणसांनी स्नान करावे असा संकेत आहे . तो पहाटे ४ नंतर ..आणी पिशाच्य योनी साठी रात्री १२ ते ३ आहे . असे असताना चुकुन या विधवा बाई नेहमी प्रमाणे आपल्या नेमा प्रमाणे मध्यानरात्रीच स्नानास गेल्या होत्या .

त्यांचा उद्देश्य फक्त गंगा ( कृष्णा ) स्नान करणे हाच होता . पण त्या जेव्हा घाटावर गेल्या तेंव्हा त्यांच्या आधीच काही ब्रह्मसम्बंध हे घाटावर स्नान करून पठणास बसले होते ..त्या स्त्रीने ते ओळखले की आपण आज अवेळी चुकून आलो आहोत …आणी त्या साहजिकच घाबरल्या .. हे त्या पिशाच्य योनीतील ब्रम्हसंबंधांनी ओळखले …त्यांनी त्या स्त्रीची विचारपुस केली .तुम्ही घाबरू नका सांगीतले ..तुम्ही आज खुप लौकर आला आहात. असे इतक्या अपरात्री कधी येत जावू नका. आज आम्ही तुम्हाला घरी नेवून सोडतो असे सांगीतले.

आणी त्या ब्रह्मसंबंधांनी त्या स्त्रीला रास्ते वाड्यात आणून सोडले. ती स्त्री घाबरली होती , वाड्यात तिला सोडल्या नंतर त्या स्त्रीच्या नातेवाईकांना त्या ब्रह्मसंबंधाने सांगितले की तुम्हीही घाबरू नका पण पुन्हा या यावेळी यांना घाटावर पाठवत जावू नका. त्या आता घाबरल्या आहेत त्यांना विश्रांती घेवू द्यात.

आणी त्यांना सांगीतले की मी अमुक अमुक रास्तेच असून या घराण्याचा पूर्वज आहे. आम्ही रोजच या घाटावर यावेळी आमचे नित्यकर्म करण्यासाठी येत असतो……

ही कथा (संक्षिप्त)लिहिली आहे .

म्हणून अपरात्री आपण माणसांनी नदीवर स्नान करु नये असे म्हणतात , आपण ब्रह्ममुहूर्तावर स्नान करावे ….!

*वि.ग.सातपुते ( विगसा)*

*( 9766544908 )*

👍👍👍👍👍👍👍

 

 

*संवाद मिडिया*

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण (Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

*Advt Link👇*

————————————————–

📝 *प्रवेश सुरु!* *प्रवेश सुरु!*📝

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण ( Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

👉 Ju Kg ते आठवी वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी जेवण 🍛व क्लासची एकत्रित सुविधा 📚👩🏻‍💻

 

(होमवर्क तसेच Grammer इत्यादीचा परिपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट)📑

 

👉 TV, Mobile यापासून दूर ठेऊन मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेशीत

 

⏰ *वेळ: सकाळी 10 ते 5:30 पर्यंत*

 

👉 (मिलाग्रीस हायस्कूल मधील मुलांना पिकअप करण्याची सोय आहे)

 

*पत्ता:* बाबा फर्नांडिस F – 122, बांदेकर मेस समोर, मिलाग्रीस हायस्कूल नजिक, सालईवाडा, सावंतवाडी

 

📱 *संपर्क:*

सौ.सरोज राऊळ मो.नं: 8983757132

सौ.सुरेखा बोंद्रे मो. नं: 8975257453

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा