मालवण :
प्रशासक तथा मुख्याधिकारी व पोलिस निरीक्षक श्री. प्रविण कोल्हे यांच्या उपस्थितीत शहरातील विविध भागातील माती संकलित करण्यात आली.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत “माझी माती माझा देश” या मोहिमेअंतर्गत दिनांक 01 ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये अमृत कलशांमध्ये माती गोळा करण्यासाठी अमृत कलश यात्रा आयोजन करणेबाबत केंद्र व राज्य शासनाकडून सूचना प्राप्त झालेली आहे. या अंतर्गत दिनांक 13 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता मालवण शहरात प्रभाग निहाय फिरुन अमृत कलशांमध्ये माती गोळा करण्यासाठी अमृत कलश यात्रा आयोजन करण्यात आले.
अमृत कलश यात्रेची सुरुवात मालवण नगरपरिषद येथून प्रशासक तथा मुख्याधिकारी, श्री. संतोष जिरगे, व पोलिस निरीक्षक श्री. प्रविण कोल्हे यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली. या अमृत कलश यात्रेमध्ये सर्व अधिकारी/ कर्मचारी उपस्थित होते. मालवण नगरपरिषद येथून वाजत गाजत अमृत कलश यात्रेचे श्री देव रामेश्वर मदिर, देऊळवाडाच्या दिशेने प्रस्थान करण्यात आले.
“माझी माती माझा देश” या मोहिमेत प्रभाग निहाय फिरुन अमृत कलशांमध्ये माती गोळा करण्यासाठी सर्वप्रथम प्रभाग क्रमांक 02 श्री देव रामेश्वर मंदिर येथून सुरुवात केली. श्री देव रामेश्वर मंदिर येथे माजी नगरसेवक श्री. जगदिश गांवकर श्रीमती पुजा करलकर, श्रीमती निना मुंबरकर, राजकीय पक्षातील पदाधिकारी श्री सौरभ ताम्हणकर, श्री. ललित चव्हाण, श्री. प्रमोद करलकर, जेष्ठ नागरीक अरविंद म्हापणकर व स्थानिक नागरीक, अंगणवाडी शिक्षिका व लहान मुले, आदी उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक 07 कलावती आई मंदिर, वायरी येथे माजी नगरसेवक श्री. आप्पा लुडबे, श्रीमती पुजा करलकर, श्रीमती निना मुंबरकर, राजकीय पक्षातील पदाधिकारी श्री सौरभ ताम्हणकर, मंदिर समिती सदस्य श्री. राजेश कुडाळकर व स्थानिक नागरीक उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक 08 श्री देव दांडेश्वर मंदिर, दांडी येथे माजी नगरसेविका श्रीमती सेजल परब, राजकीय पक्षातील पदाधिकारी श्री. सन्मेश परब, श्री सौरभ ताम्हणकर तसेच स्थानिक नागरीक उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक 06 राममंदिर मंदिर, गवंडीवाडा येथे माजी उपनगराध्यक्ष श्री. राजन वराडकर, माजी नगरसेवक श्री. नितीन वाळके, श्रीमती जयमाला मयेकर, राजकीय पक्षातील पदाधिकारी श्री. अमेय देसाई, श्री. मंदार ओरसकर, श्री सौरभ ताम्हणकर, श्री पपू परब, सेवानिवृत्त कर्मचारी व स्थानिक नागरीक उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक 05 काळबादेवी मंदिर, मेढा येथे माजी नगराध्यक्ष श्री. सुदेश आचरेकर, माजी नगरसेविका श्रीमती ममता वराडकर, राजकीय पक्षातील पदाधिकारी श्री. नरेश हुले, श्री सौरभ ताम्हणकर, व मंदिर समिती सदस्य श्री. धुरी व स्थानिक नागरीक उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक 04 जयगणेश मंदिर, मेढा येथे माजी नगरसेवक श्री. गणेश कुशे, श्रीमती ममता वराडकर, माजी राजकीय पक्षातील पदाधिकारी श्री सौरभ ताम्हणकर, व मंदिर व्यवस्थापक श्री. शैलेश लुडबे व स्थानिक नागरीक उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक 03 माघी गणेश मंदीर येथे माजी नगरसेवक श्री. यतिन खोत, श्रीमती ममता वराडकर, राजकीय पक्षातील पदाधिकारी श्री. मोहन वराडकर, श्री सौरभ ताम्हणकर, व मंदिर समिती सदस्य व स्थानिक नागरीक उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक 01 श्रीकृष्ण मंदिर, धुरीवाडा येथे राजकीय पक्षातील पदाधिकारी श्री. भाई कासवकर, श्री. बाबी जोगी, श्री सौरभ ताम्हणकर, व मंदिर समिती अध्यक्ष श्री. दत्तात्रय केळुसकर व स्थानिक नागरीक उपस्थित होते.
या कार्यक्रमास मालवण शहरातील नागरीकांकडून मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे अमृत कलश यात्रा यशस्वी झाली. याबद्दल श्री. संतोश जिरगे, प्रशासक तथा मुख्याधिकारी आभार मानले.
मुख्य अधिकारी तथा प्रशासक
मालवण नगरपरिषद