*पारिजात साहित्य समूह प्रमुख लेखक कवी प्रा.एस यू. मुल्ला लिखित अप्रतिम लेख*
*आरक्षण हवे की नको*
“”””””””””””””””””””””””””””””
भारत देश विविधतेने नटलेला आहे. देशामध्ये अनेक प्रकारच्या धर्माची, जातीची, पंथाची आणि गरीब ,श्रीमंत सर्व प्रकारचे लोक हजारो वर्षापासून एकत्र नांदत आहेत. देशामध्ये सामाजिक विषमता तर आहेच परंतु प्रचलित आर्थिक विषमता अनेक प्रकारच्या समुदायांना आरक्षणाकडे आकर्षित करत असते. बेरोजगारी आणि गरिबी या देशातील मुख्य समस्या आहेत. बऱ्याच लोकांना असे वाटते की सर्व प्रश्नांवर एकच तोडगा आहे तो म्हणजे आरक्षण…!
सध्या देशामध्ये खालील प्रमाणे आरक्षण आहे
ST …7.5%
SC…15%
OBC….27%
EWS….10%
टोटल…..५९.५%
महाराष्ट्रातील मराठा, गुजरात मधील पटेल, आंध्रा मधील कापू, राजस्थानातील गुर्जर आणि हरियाणातील जाट इत्यादी जाती समूह केंद्र सरकारकडे आरक्षणाची मागणी करीत आहेत. यातील बऱ्याच जणांनी आपला समावेश ओबीसी कॅटेगरीमध्ये करण्याची मागणी केली आहे आणि ज्या जाती समूहांचा ओबीसी मध्ये समावेश करण्यात आला आहे ते याला विरोध करीत आहेत.या सर्व पार्श्वभूमीवर आपल्या सर्वांसमोर एकच प्रश्न आहे तो म्हणजे आरक्षण हवे की नको..? या प्रश्नाचे उत्तर आहे हो आणि नको….
हो कारण आपल्या देशामध्ये भारतीय राज्यघटनेनुसार ज्या जाती समूहांना आरक्षण लाभले आहे त्या जाती समूहांना हजारो वर्षासाठी शिक्षण आणि इतर सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले होते. आर. एस. एस. प्रमुख मोहन भागवत.. यांनी नुकतेच आरक्षणावर टीकाटिप्पणी करताना म्हटले की.. दोन हजार वर्षापासून ज्या जाती समूहांना सामाजिक विषमतेमुळे भेदभाव सहन करावे लागले ते जाती समूह जोपर्यंत इतर जाती समूहा बरोबर येत नाहीत तोपर्यंत त्यांना आरक्षणाची सुविधा द्यावी लागेल. माझ्या मते संघप्रमुख रास्तच आहेत. ज्या जाती समूहांना घटनेमध्ये आरक्षण उपलब्ध झाले आहे त्यांनी स्वतःचा विकास आरक्षणामुळे घडवून आणला आणि ते पाहून इतर जातींना देखील आरक्षणाचा मोह पडला आहे आणि त्यामुळेच देशातील जवळजवळ सर्वच जातीसमूह आरक्षणाची मागणी करीत आहेत. देशातील राज्यकर्त्यांना आजही असे वाटते की आरक्षणाचा लाभ समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलेला नाही त्यामुळे जे आरक्षण पहिल्या दहा वर्षातच संपुष्टात येणार होते ते आज स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानंतर देखील चालू आहे. त्यामध्ये भर पडली आहे ती २७% ओबीसी आरक्षणाची… ! एक जानेवारी १९७९ रोजी मंडल कमिशनची स्थापना झाली खासदार बी.पी. मंडल यांच्या अध्यक्षतेखालील या कमिशनने ३१/१२ /१९८०
रोजी आपला अहवाल राष्ट्रपतींना सोपवला. १९९० मध्ये तत्कालीन पंतप्रधान व्ही पी सिंग यांनी मंडल कमिशनच्या तरतुदी देशामध्ये लागू केल्या आणि जवळजवळ ५०% असणाऱ्या ओबीसी समाजासाठी २७% आरक्षण प्राप्त झाले. त्यामध्ये अजून एक भर पडली ती १० % EWS म्हणजे आर्थिक दृष्ट्या मागासलेल्यांसाठी आरक्षण. अशाप्रकारे जवळजवळ संपूर्ण देशामध्ये ६०% सरकारी नोकऱ्या आरक्षित आहेत. महाराष्ट्र राज्यातील चित्र यापेक्षा थोडेसे वेगळे आहे वरील आरक्षणासमवेतच महाराष्ट्रामध्ये SBC,NT,(A), NT(B), NT(C) NT(D) म्हणजेच भटके ,विमुक्त जाती आणि जमाती, धनगर आणि वंजारी समूहासाठी थोड्याफार प्रमाणामध्ये आरक्षण उपलब्ध आहे.
वरील सर्व जाती समूहासाठी उपलब्ध असलेल्या आरक्षणामुळेच केवळ सरकारी नोकऱ्या मिळवता येऊ लागल्या आहेत असा एक समज सर्वसामान्य जनतेमध्ये आहे परंतु हे १००% सत्य नव्हे. ज्या जातीसमूहासाठी आरक्षण नाही ते केवळ सरकारी नोकरी मिळवण्यासाठी आरक्षणाची मागणी करत आहे.हे सर्व सरकारी नोकरी आणि खाजगी नोकऱ्यांमध्ये असेलेल्या पगाराच्या तफावापोटी. असे आढळून आले आहे की… सरकारी सेवेत असणारे कर्मचारी सरासरीने रु ९८५ किंवा त्यापेक्षा जास्त दररोज कमावतात. तर खाजगी सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दररोज सरासरी रु.३८५ एवढा पगार मिळतो. केंद्र आणि राज्य सरकारच्या सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगारा व्यतिरिक्त निवृत्तीवेतन, भविष्य कल्याण निधी सारख्या अनेक सुविधा मिळत असतात. त्या खाजगी क्षेत्रात तितक्याश्या उपलब्ध नाहीत त्यामुळेच सरकारी नोकरीचे आकर्षण समाजातील सर्व घटकांमध्ये आढळून आले आहे. काही ठिकाणी तर शेतकरी समाजातील मुलांची लग्न जमवणे कठीण झाले आहे.कारण शेतकरी नेहमी आर्थिक अडचणीमध्ये सापडलेला आढळतो आणि सरकारी सेवक गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवून मलाईदार आयुष्य जगत असतो. आणि त्यामुळेच प्रत्येकाला हवी असते सरकारी नोकरी …! शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रातील आरक्षण…!
आता आरक्षण का नको ते पाहूया….
आरक्षणामुळे हुशार मुलांच्या प्रतिभेवर विपरीत परिणाम तर होतोच त्याबरोबरच त्यांच्यासाठी उपलब्ध असणाऱ्या संधी देखील आकुंचित पावतात. त्यामुळेच की काय, भारतातील हुशार विद्यार्थी अमेरिकेमधील सिलिकॉन व्हॅलीमध्ये नोकरी करतात आणि अमेरिकेची आर्थिक परिस्थिती समृद्ध करतात. बऱ्याच लोकांचे असेही म्हणणे आहे की हा Brain Drain.. थांबवावयाचा असेल तर सर्वांसाठी समान level playing field… निर्माण करणे आवश्यक आहे. बरेच लोक आरक्षित जाती समूहातील rich and powerful असणाऱ्यांना आरक्षणाची सुविधा देण्यासाठी विरोध करतात. त्यांचे म्हणणे आहे की ओबीसी मध्ये ज्याप्रमाणे creamy layer चा कन्सेप्ट आहे तो एससी आणि एसटी या कॅटेगरीसाठी सुद्धा अमलात आणावा. आरक्षणामुळे गुणवत्ता नसलेल्या काही जणांना मोठ्या जागेवर मिळणारे पद हे सुद्धा बऱ्याच लोकांना न पटणारे आहे. आणि हा सर्व गोंधळ संपवावयाचा असेल तर सर्व प्रकारचे आरक्षण रद्द करून फक्त आर्थिक निकषावर आरक्षण असावे असे म्हणणारे ही बरेच लोक आहेत.
भारतीय राज्यघटनेनुसार धार्मिक आधारावर कुणालाही आर्थिक, शैक्षणिक , राजकीय आरक्षण मिळत नाही त्यामुळेच विविध राज्यांमध्ये देण्यात आलेले मुस्लिम समुदायासाठी चे आरक्षण न्यायालयात तग धरू शकले नाही.५०% ची आरक्षणाची मर्यादा असल्यामुळे मराठा आणि जाट समुदायाला दिलेले आरक्षण ही सुप्रीम कोर्टामध्ये रद्द करण्यात आले. त्यामुळे असे वाटते की आरक्षण या प्रश्नाचा एक वेळच सोक्षमोक्ष सरकारने लावावा त्यासाठी आवश्यक असणारी घटना दुरुस्ती ही करावयास हवी ,असे बऱ्याच समाज धुरीनांना वाटते. मला जर माझे प्रांजल मत विचाराल तर त्यांच्यासाठी आरक्षण हवे ज्यांना शिक्षणापासून हजारो वर्ष वंचित ठेवण्यात आले आहे आणि त्या सर्व लोकांच्यासाठी जे आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहेत परंतु एक गोष्ट मात्र निश्चित Reservation is not a poverty alleviation program .
प्रा एस यू मुल्ला
एम. फार्म. एलएल.बी
9821419833
*संवाद मिडिया*
*गुरुजनांसाठी हिरो ची खास ऑफर..*
*सविस्तर वाचा👇*
————————————————–
💥 *शिक्षकदिन विशेष ऑफर* 💥
खास आपल्या गुरुजनांसाठी हिरो वाहन खरेदीवर खास सवलत 😇😇
HF DLX/SPLENDOR/PASSION सिरीझ वर रुपये 2000/-
SUPER SPLENDOR/GLAMOUR सिरीझ वर रुपये 2500/-
SCOOTER/PREMIUM सिरीझ वर रुपये 3000/-
दिनांक 20/09/2023 पर्यंत 🗓️
आजच बुक करा..📝
🎴मुलराज हिरो, एम.आय.डी.सी. कुडाळ
📱9289922336 / 7666212339
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————-
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*