You are currently viewing कणकवली पटवर्धन चौकात वाहनचालकांना होणारा त्रास कमी होणार

कणकवली पटवर्धन चौकात वाहनचालकांना होणारा त्रास कमी होणार

कणकवली
कणकवली शहरात पटवर्धन चौकात फ्लाय ओव्हर ब्रिज काम सुरू असल्यामुळे सातत्याने होत असलेली वाहतूक कोंडी व वाहनचालकांना होणाऱ्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी गुरुवारी पटवर्धन चौकात महामार्ग प्राधिकरण चे अधिकारी व ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी करून सूचना दिल्या. यावेळी सर्विस रोड वरून येणारी वाहने वळविण्यासाठी वाहन चालकांना पेट्रोल पंप पर्यंत जावे लागते. त्यामुळे पटवर्धन चौका जवळच गवाणकर हार्डवेअर समोरिल भाग गुरुवारी रात्री नंतर खुला करा. तसेच लक्ष्मी दत्त कॉम्प्लेक्स च्या तळमजल्यातील गाळेधारकांचे चा प्रश्न तातडीने सोडवा. अशा सूचना श्री नलावडे यांनी दिल्या. पटवर्धन चौकात फ्लाय ओव्हर ब्रिज चे काम सुरु असल्याने सर्विस रस्त्यालगत लावलेले पत्रे वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. हे पत्रे पुढे लावण्यापूर्वी सर्व्हिस रोडवर होणारी दुचाकीचे पार्किंग फ्लाय ओव्हर ब्रिज खाली करण्यासाठी तात्पुरती जागा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना श्री नलावडे यांनी दिल्या. तसेच गवाणकर हार्डवेअर समोर खाली बसलेले भाजी, फळ व फूल विक्रेते यांना तेथून हटवून त्या पुढील भागात त्यांच्यासाठी तात्पुरती जागा उपलब्ध करा व जोपर्यंत लक्ष्मी दत्त कॉम्प्लेक्स चा तळमजला तील गाळेधारकांच्या प्रश्न निकाली निघत नाही तोपर्यंत फ्लाय ओव्हर ब्रिज चे पुढील काम घाईगडबडीने करू नका असे श्री नलावडे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. सर्विस रस्त्यालगत लावण्यात आलेली दुकाने हटवून वाहतुकीस रस्ता खुला ठेवण्याबाबत पोलिसांशी चर्चा करा व तातडीने ही कामे मार्गी लावा असे नगराध्यक्ष यांनी सांगितले. यावेळी लक्ष्मी दत्त कॉम्प्लेक्स मधील गाळेधारकांनी हायवे ठेकेदार कंपनीने रातोरात साईड पट्टीला माती टाकल्याने तळमजल्याच्या गाळ्यांची शटर उघडता येणार नाहीत त्यामुळे आम्ही करायचे काय असा सवाल उपस्थित केला. त्यावर नगराध्यक्ष श्री नलावडे यांनी ती टाकलेली माती तातडीने दूर करा अशा सूचना दिल्या. यावेळी शहराध्यक्ष अण्णा कोदे, संजय सावंत, राजू सावंत, पांडूरंग वर्दम, आशिष पोयेकर, महामार्ग प्राधिकरण चे उपअभियंता श्री मन्यार, शाखा अभियंता गणेश महाजन, दिलीप बिल्डकॉन चे आर बी परिहार, वाहतूक पोलीस विश्वजीत परब आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा