*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम कथा*
*भूतांखेतांच्या कथा..*
(भाग 21 वा…)
सत्यकथा.. !!!
. ………
गेल्या विसाव्या भागात मी बाधित वास्तु मधील एक सत्यानुभव लिहिला आहे . तसाच हा दूसरा अनुभव.
मी व्यवसाय तसेच निवास एकत्र असु शकेल किंवा करता येईल अशी जागा पहात होतो. योगायोगाने ती जागा माझ्या कानावर आली. प्रत्यक्ष त्या बंगल्याचे मालकच स्वतः मला भेटले.मालक व्यक्ती चांगली होती ,सधन होती . मी लगेचच तो बंगला पाहण्यासाठी गेलो .प्रथम दर्शनीच तो मला आवडला. ५००० हजार स्वकेर फुट जागा त्यात 2500 स्क्वेअर फुट 3 मजली उत्तम अगदी देखणे बांधकाम आणी 2500 स्क्वेअर फुट मोकळी जागा .साऱ्या 9 रूम्स प्रशस्त. बैठकीचे दोन मोठे हॉल .बाकी सर्व उत्तम . टेरेसवर गार्डन आणी लाईटिंग केलेले पाण्याचे कारंजे होते. शिवाय पाण्याची विहीर. मला तर तो मनातून आवडला . मी त्या मालकांना सांगीतले की मला माझ्या कुटुंबाला ही वास्तु दाखवावी लागेल .सर्वाना आवडली तर मी लगेच व्यवहारही करेन. ते म्हटले ठीक आहे . मी तुम्हाला बंगल्याच्या चाव्याही देतो . तुम्ही तुमच्या कुटुंबाला जरूर दाखवा .मी किल्या माझेकडे ठेवून घेतल्या. मालकांना मी अपेक्षित किंमत विचारली त्यांनी 30 लाख रुपये अपेक्षित आहे असे सांगीतले . पण व्यहाराला बसु तेंव्हा कमिजास्त करूया असे सांगिलते . वैयक्तिक मी तर त्या वास्तुच्या मोहातच पडलो होतो .आणी मनात तो व्यवहार करायचा असा निर्णय घेतला .. माझ्या घरातील सर्वाना तसेच माझे काही मित्र होते त्यांनाही बंगला आवडला.
शेवटी सातारहुन माझ्या आईवडिलांनाही बोलावून घेतले.त्यांनी बंगला पहाताच ते म्हणाले आपल्या सातारच्या बंगल्यापेक्षाही ही वास्तु छान आहे . झाले वास्तु घेण्याचे निश्चितच झाले. ३ मजले निवास आणी ग्राउंड फ्लोअरला व शेजारील 2500 स्क्वेअर फुट मोकळ्या जागेत इंडस्ट्रीअल शेड बांधुन आपला व्यवसायही इथे करता येईल तेंव्हा हा व्यवहार आपण ठरवुया असे ठरले. एका बैठकीत तो 30 लाखाचा व्यवहार 22 लाख रूपयाला ठरला .. मी लगेच रु .2 लाख टोकन मनी दिले . व्यवहार पूर्ण करण्यासाठी 3 महीने मुदतही मिळाली..माझे कुटुंब व त्या बंगल्याच्या मालकाचे कुटुंब आम्ही एकत्र जेवलो देखील. घेणारा आणी देणारा दोघेही समाधानी होते.
आता माझे त्या बंगल्यात रोज येणे जाणे सुरु झाले . पार्किंग , गार्डन , तुळशी वृंदावन असे थोड़े बहुत आवश्यक जे काही बदल करावयाचे त्या बद्दल चर्चाही झाली.मला कुठलीच शंका आली नव्हती.पण काहींच्या मनात अनेक तर्क वितर्क आले. एवढा मोट्ठा बंगला आज फक्त 22 लाखात ती व्यक्ती कां देते आहे ?
इतक्या सुंदर बंगल्यात ते कां रहात नाहीत ? असे अनेक प्रश्न उभे राहिले.
पुन्हा चर्चेला उत आला. शेवटी माझ्या मुलाने एका प्रख्यात वास्तु तज्ञाला बोलावले ते त्यांचे दिशादर्शक होकायंत्र घेवून आले ..आम्ही सर्व बंगला 1 तासभर फिरलो ..ते वास्तुतज्ञ त्या बंगल्यात एक शब्दही बोलले नाहीत. मात्र माझ्या बंगल्यात आल्यावर त्यांनी एकाच शब्दात सांगीतले. तुमच्या बोलण्यातुन तुम्हाला तो बंगला आवडला आहे. तुम्ही 2 लाख रुपये ऍडवान्सही दिला आहे. हेही मला तुमच्या मुलाने मला सांगीतले आहे . पण मी तुम्हाला म्हणेन की ती वास्तु ही दूषित आहे फुकट दीली तरी तुम्ही घेवू नका .2 लाख बुडले तरी चालतील.. एक काम करा शेजारी पाजारी सर्व व्यवस्थित चौकशी करा . त्या वास्तुत स्वतः ते मालकच कां रहात नाहीत ..?
मग आम्ही चौकशी केली. तर तेथील लोकांच्या सांगण्यात असे आले की ती वास्तु तीन रस्त्यावर म्हणजे तिकाटण्यावर आहे शेजारी मोठा ओढ़ा आहे ..समोरच मोठे विस्तीर्ण पिंपळाचे झाड़ आहे ..रस्ता अरुंद असल्यामुळे त्याच्या फांदया बंगल्यावर आल्या आहेत .अशा गोष्टी वास्तुशास्त्रा नुसार असु नयेत असे म्हणतात . आणी दूसरे महत्वाचे म्हणजे त्या वास्तुत त्या मालकांची विधवा आई दुर्धर आजाराने मरण पावली आहे. तीचा अतृप आत्मा त्या वास्तुत आहे. आणी तीचे अस्तित्व त्या बंगल्यात जाणवते .आणी त्या कुटुंबालाही तिथे त्रास झाला आहे म्हणून एवढा सुंदर मोट्ठा स्वतःचा बंगला सोडुन ते आज भाडयाने दुसरीकडे रहात आहेत .म्हणूनच हा बंगला गेली 3 वर्षे बंद आहे. तुम्ही कसा घेत आहात याचेच मला आश्चर्य वाटते आहे .
या गोष्टी मला काही पटेनात. परंतु हे सर्व ऐकल्यावर माझ्या कुटुंबाचा प्रचंड विरोध मला झाला . सरते शेवटी माझ्या मुलाने वास्तुशास्त्र या सिनेमाची सीडी आणून मला दाखविली ..मग मला त्यात काहीतरी तथ्य असावे असे वाटले ….आणी तो व्यवहार रद्द केला . पण माझे रु.2 लाख अडकले ..मालक मला म्हणाले मी तुमचे 2 लाख आता देवू शकत नाही , तुमचा व्यवहार निश्चित आहे म्हणून तुम्ही देलेले पैसे मी मी घेत असलेल्या एका फ़्लैटमद्धये गुंतवले आहेत .एक करा तुमची रक्कम फिटे पर्यन्त तुम्ही बंगला भाडयाने वापरा . माझ्यापुढे पर्याय नव्हता ..आणी तो बंगला दरमाहा 8 हजार रुपये भाडयाने माझ्या ताब्यात ठेवला . व माझ्याकडे काम करणाऱ्या एका बिहारी कंत्राटदाराला दिला .. त्याचे अनुभव पुढील 22 व्या भागात ….
* # *©विगसा*
*संवाद मिडिया*
*गुरुजनांसाठी हिरो ची खास ऑफर..*
*सविस्तर वाचा👇*
————————————————–
💥 *शिक्षकदिन विशेष ऑफर* 💥
खास आपल्या गुरुजनांसाठी हिरो वाहन खरेदीवर खास सवलत 😇😇
HF DLX/SPLENDOR/PASSION सिरीझ वर रुपये 2000/-
SUPER SPLENDOR/GLAMOUR सिरीझ वर रुपये 2500/-
SCOOTER/PREMIUM सिरीझ वर रुपये 3000/-
दिनांक 20/09/2023 पर्यंत 🗓️
आजच बुक करा..📝
🎴मुलराज हिरो, एम.आय.डी.सी. कुडाळ
📱9289922336 / 7666212339
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————-
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*