You are currently viewing आठव

आठव

आठव

आठव तुझी नाही हृदयी कसं आता म्हणू मी?
गालावरची ओघळ माझ्या अजुनी पुरी सुकली नाही…

मावळतीला गेला रवी, वाट कशी नको पाहू मी?
उन्हासोबत सावलीही गेली तरीही छबी तुझी दिसली नाही…

सांजच्या या संधीप्रकाशात, चांदण्यात कसा न्हाऊ मी?
चंद्र असूनी सोबतीला तारकांतही तू हसली नाही…

अवकाशातूनी तुटता तारा काजवा कसा समजू मी?
लुकलूकणाऱ्या काजव्यांतही तू ताऱ्यासम भासली नाही…

अवखळ भाबड्या हृदया कितीक अजुनी समजावू मी?
कस्तुरी परीस गंध दरवळला श्वासातही तू बसली नाही…

रात्र सरली पहाट झाली, प्रकाशास कसा अडवू मी?
सोनेरी ती कोवळी किरणे अंगअंग तू नेसली नाही…

आठव तुझी नाही हृदयी कसं आता म्हणू मी???

(दिपी)
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा