सबसिडीच जमा नसल्यामुळे विमा परतावा बाकी*
संतोष वरेरकर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन*
देवगड
सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदारांना अद्यापही विमा कंपनीकडून विम्याची रक्कम प्राप्त होत नाही. सातत्याने कंपनीशी संपर्क साधला असताना त्यांनी राज्य सरकारकडून कंपनीला सबसिडीची रक्कम उपलब्ध होईल, तेव्हाच रक्कम देण्यात येईल असे उत्तर देण्यात येते. कोकणातील बागायतदारांवरच अन्याय का केला जातो, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते संतोष वरेरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे केला आहे.
वरेरी येथील आंबा बागायतदार व सामाजिक कार्यकर्ते वरेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांना विमा कंपनीकडून विम्याची रक्कम प्राप्त होत नसल्याबाबत निवेदन दिले होते. या निवेदनावर मुख्यमंत्री कार्यालयाकडून कृषी आयुक्तांकडे हे पत्र पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्याचे उत्तर देण्यात आले. तर विमा कंपनीशी ६ सप्टेंबर रोजी वरेरकर यांनी फोनद्वारे संपर्क साधला असता विमा कंपनीच्या अधिकारीवर्गाने राज्य शासनाकडून सबसिडीची रक्कम अद्यापही कंपनीला प्राप्त झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना विम्याची रक्कम देता येत नाही, असे उत्तर दिले आहे.
वरेरकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, मुख्यमंत्री कार्यालयाकडून पुढील कार्यवाहीसाठी निवेदन कृषी आयुक्तांकडे पाठविण्यात आले, असे उत्तर प्राप्त होते. तर कृषी आयुक्त त्या निवेदनाबाबत शेतकऱ्यांच्या या प्रश्नांवर काहीच उत्तर देत नाहीत. याचा अर्थ प्रशासनाला शेतकऱ्यांची काही गरज दिसत नाही असेच दिसत आहे, अशी खंत वरेरकर यांनी व्यक्त केली आहे.
*संवाद मिडिया*
*_–🧤–साई वॉटरप्रुफिंग–💧–_*
*साई वॉटर प्रुफिंगची संपूर्ण महाराष्ट्रसह गोव्यात अग्रेसर सर्व्हिस*
*🙏आमची वैशिष्ट्ये : 👇*
✔️🏬 इमारतीची तोडफोड न करता पावसाळ्यात १०० टक्के संरक्षण,
✔️गराऊंटिंग इंजेक्शन.
✔️ उन्हाळ्यात थंड, हिवाळ्यात उबदारपणा,
✔️पाच वर्षाची हमी.
*श्री आशिष लोके*
*संपर्क : 8080493894 /9420208100*
———————————————-
-वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*