*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे, लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम कथा*
*भुताखेतांच्या कथा*
*(भाग २० वा …)*
एका सुंदर शहरातील ही घटना आहे. माझ्या पेपर स्टेशनरी मैन्युफैक्चरिंग व पुस्तक प्रकाशन मोठा व्यवसाय असल्यामुळे मला प्रशस्त जागेची आवश्यकता होती. वर्क प्रोसेसिंग गोडावून , ऑफिस , स्टोअर यासाठी जागा होती ती खुप कमी पड़त होती ,म्हणून मी एक मोट्ठा बंगला भाड़े तत्वावर घेतला होता . पूर्वी बरेच दिवस तो बंगला बंद होता. भाडेही तसे कमी होते . आणी मला जागेची त्वरित आवश्यकता होती त्यामुळे आजुबाजुच्या लोकांनी तो बंगला बाधित आहे असे सांगून देखील मी त्यावेळी त्या लोकांच्या बोलण्याकड़े दुर्लक्ष केले होते .
कारण वास्तु जरी दूषित असला तरी आपला प्रामाणिक हेतु आहे . आणि या व्यवसायात अनेक कामगारांना काम उपलब्ध होवून त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ चालणार आहे , हेही एक सत्कार्य आहे ही भावनां मनात होती . तेंव्हा तो वास्तु आपल्याला काही त्रास देणार नाही असा विश्वास मनी बाळगुन मी स्वतः तो बंगला स्वच्छ करून रंगरंगोटी करून व्यवस्थित करून घेतला. तिथे माझ्या व्यवसायतील एक सेक्शन सुरु केला. तिथे १००/१२५ माणसे (कामगार) कामासही होती. रोज २४ तास काम तिथे सुरु असे. पण जेंव्हा जेंव्हा तिथे त्या जागेत काही ठिकाणी माझे जाणे झाले की मलाच स्वतःला अवस्थ वाटे. बेचैन होत असे काही समजत नसे. कधी अंग शहारल्या सारखा भास होत असे. काहीतरी संचारल्या सारखा भासही होत असे. कुणीतरी अदृश्य स्वरुपात इथे आहे असाही मला भास होई. पण त्या वास्तुत मी एक दत्तात्रयाची मूर्ती बसविली होती. मी दत्तभक्त असल्यामुळे गुरुचरित्र पोथीचे वाचन माझे नित्य असे. कारखान्यात रोज पूजाही होत असे. त्यामुळे मी निर्धास्त होतो . पण व्यवसायात २४ तास काम करूनही समाधान मात्र नव्हते. काही ना काहितरी अड़चण येत असे. कधी कधी मशीन्स बंद पड़त असत. इलेक्ट्रिक मोटारचे प्रोब्लेम येत असत , विविध स्तरावर कामे विनाकारण रेंगाळत असत. असे कधीच झाले नव्हते . बाकीची यूनिट्स उत्तम चालली होती , पण या वास्तुतील व्यवसाय मात्र तोटयात सुरु होता असे असे जाणवत होते ..उर्जितावस्था नव्हती हे जाणवले..आणी सरतेशेवटी प्रचंड नुकसानही झाले. ही सत्य वस्तुस्थिती नाकारता येत नाही. अनुभवांती पुढे ती जागा मी सोडली आणी , तोच व्यवसाय दुसऱ्या जागेत सुरु केला ..उत्तम चालला .
इतरांनी त्या वास्तुबद्दल सांगून देखील मी दुर्लक्ष केले होते ..माझा लॉसही झाला ..त्यामुळे मी मुद्दाम पुन्हा ज्या माणसांनी मला तो वास्तु दूषित आहे असे सांगीतले होते ,त्यांना पुन्हा आवर्जून भेटलो ..तेंव्हा त्या जागेच्या मालकाच्या कुटुंबातील एका व्यक्तिने त्या वास्तूत गळफास घेऊन आत्महत्या केली होती असे कळले . त्यामुळे त्या वास्तुत त्या बंगल्याचे मालक देखील स्वतः देखील राहु शकले नाहीत . एवढेच नव्हे तिथे कुणीही भाड़ेकरु सुखी राहु शकले नाहीत असे सांगीतले .. आणी याला पुष्टी मिळाली त्याचे कारण म्हणजे मी जागा भाडयाने घेतली तेंव्हाही मालक ताबा देण्यासाठी किंवा भाड़े मागण्या साठी देखील कधीही त्याच्या वास्तुत आला नाही . त्याच्या खात्यावर भाडयाचे पैसे मी ट्रान्सफर करीत असे. तेंव्हा वास्तु निश्चित दूषित आहे याची जाणीव झाली .तेंव्हा ही अतृप्त पिशाच्च्य योनी आहे असे म्हणावे लागते.स्वतःला अनुभव आल्याशिवाय या गोष्टीवर विश्वास बसत नाही ..
असाच एक अनुभव पुढील २१ व्या भागात…
नमस्कार.🙏
〰〰〰〰〰〰〰〰
# *©विगसा*
( *📞9766544908* )
*संवाद मिडिया*
*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची – ओंकार ट्रेडर्स*
*लिंक वर क्लिक करा 👇*
————————————————–
*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇
*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात..*
🌐 https://sanwadmedia.com/105547
🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿
👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि रिटेलर शॉप
👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇
👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल.
🎴 *ओंकार ट्रेडर्स*
*माणगाव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*
*प्रो. प्रा. श्रीम. योगिता तामाणेकर*
☎️ *संपर्क :* ०२३६२ – २३६२६१
📱 *मो.९४२३३०४७९६,* *७७७४९००५०१,* *९४२१२६१०८९,* *९८३४३४३५४९*
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————-
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*