You are currently viewing १० सप्टेंबर : ७०व्या वाढदिवसाच्या निमित्ताने……

१० सप्टेंबर : ७०व्या वाढदिवसाच्या निमित्ताने……

*१० सप्टेंबर : ७०व्या वाढदिवसाच्या निमित्ताने……*

*बबन सराडकर : शेतीनिष्ठ कवी………*

कविवर्य बबन सराडकरांचा माझा पहिला परिचय झाला तो अमरावतीच्या श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयात. सराडकर तेव्हा करजगाव ह्या मोर्शी रोडवरील छोट्याशा गावात राहत होते .मी मराठीत एमए करीत असताना प्रतिनिधीक कविता संग्रह काढायचे ठरवले. त्याची रितसर बातमी मी वर्तमानपत्रांमध्ये दिली. ही बातमी वाचून बरेच कवी माझ्याकडे आपापल्या कविता घेऊन आले .त्यामध्ये एक कवी होते बबन सराडकर. तेव्हापासून तर आजपर्यंत बबन आणि मी सोबत होतो,आहोत आणि राहणारही आहोत. आमची तेव्हाची जी मैत्री आहे ती दिवसेंदिवस घट्ट होत गेली आणि त्यातून साहित्य संगम या साहित्यिक संस्थेची निर्मिती झाली .आज महाराष्ट्रामध्ये अमरावतीच्या ज्या काही कवींचा गौरव पूर्ण उल्लेख केला जातो त्यामध्ये बबनचे नाव अग्रस्थानी आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही .सर्वश्री सुरेश भट, उद्धव शेळके, मधुकर केचे, बाबा मोहोड, शरदचंद्र सिन्हा,सुदाम सावरकर, भाऊ मांडवकर यांच्या नंतरच्या अमरावतीच्या पिढीमध्ये सराडकर यांचे नाव अग्रक्रमात आहे . खरं म्हणजे हा शेती वेडा माणूस. शेतीवर प्रेम करणारा. शिक्षणात काय पडले आहे ? म्हणून अर्धवट शिक्षण सोडून शेतीवर गुजराण करावी यामध्ये तो शेतीत पडला. शेती करू लागला. पायजमा शर्ट घालू लागला. पण शेतीतले चढ-उतार बघता बघता त्याची कविता फुलू लागली आणि जनमानसामध्ये रुजू लागली. बबन सराडकरांना तसा पूर्वइतिहास आहे. त्यांच्या शालेय जीवनामध्ये आणि महाविद्यालय जीवनामध्ये त्यांना साहित्याला पोषक असे वातावरण मिळत गेले. पुढे माझा परिचय झाल्यानंतर तर त्यांना अमरावतीच्या भव्य वातावरणाचा साहित्यिक विश्वाचा अनुभव सातत्याने येत गेला. मी तेव्हा साहित्य चळवळीत अग्रेसर होतो. शिवाय डॉ मोतीलाल राठी यांचा मानसपुत्र असल्यामुळे आणि डॉ मोतीलाल राठी यांचे सर्व स्तरातील साहित्यिकांमध्ये चांगला वावर असल्यामुळे बबन सराडकरांना ह्या सर्व गोष्टी आपोआपच मिळत गेल्या. त्यांचं घर आणि माझं कॉलेज यामध्ये फारच कमी अंतर. केवळ मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय मैदान ओलांडलं की गाडगेनगर येथील मारुतीच्या मंदिराजवळ त्यांचं घर. त्यामुळे आमची सतत ये जा असायची. तेव्हाचे आम्ही सर्व कवी मित्र अधून मधून नगर वाचनालयात एकत्र यायचो.नगर वाचनालयाच्या परिसरात असलेला बेंच आजही आमच्या लक्षात आहे .त्या बेंचवर जागा मिळवण्यासाठी शर्यत लागायची. पुढं माझे पाळंमुळं लाहोटी महाविद्यालयामध्ये पक्की झाल्यानंतर आमचे बरेचसे कार्यक्रम बऱ्याचशा सभा श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयात होत गेल्या. डॉ. मोतीलाल राठी संस्थेचे पदाधिकारी असल्यामुळे मला सर्व गुन्हे माफ होते .कॉलेजचा टेलिफोन. कॉलेजचा लाँन आणि कॉलेजच्या वर्ग खोल्या आम्ही सर्रासपणे वापरल्या .तेव्हा कॉलेजमध्ये चौकीदार नव्हता .त्यामुळे प्राचार्य मुंदडा यांना सुट्टीच्या दिवशीही काठोळे सर आपलं कॉलेज सुरू ठेवतात याचा अभिमान असायचा .अर्थातच तेव्हा सर्वांची परिस्थिती बेताचीच होती.माझे तर वडील नुकतेच वारलेले होते .कसाबसा संसार सुरू होता .पण त्या अशा तशा संसारातही आनंद होता. प्रेम होतं .पायी चालण्यातही आनंद होता . गरिबीचा लवलेशही आम्हाला जाणवत नव्हता. बबन सराडकर आणि मी साहित्य संगमचे काम बरेच वर्षे सोबत केले . पुढे आम्ही डॉ. मोतीलाल राठींना साहित्य संगमचे अध्यक्ष केले .बबनची कविता ही अनुभवनिष्ठ होती. त्याला शेतीची जोड होती. शेती मधले दुःख तो आपल्या कवितेमध्ये मांडत होता आणि ते जिवंत असल्यामुळे लोकांच्या हृदयाला भिडत होते. त्यामुळे बबन अल्पावधीत लोकांच्या हृदयात जाऊन बसला. कवी संमेलने कार्यक्रम त्याच्या वाट्याला येत गेले .एवढे कार्यक्रम मराठीच्या प्राध्यापकाच्या वाट्यालाही येत नाहीत शिवाय पुढे त्याचे कवितासंग्रह विद्यापीठात लागले. त्यामुळे आणि पुढे त्याला मिळालेला राज्य पुरस्कारामुळे त्याचा महाराष्ट्र स्तरावर गौरव व्हायला लागला आणि उत्तरोत्तर तो वाढतच आहे. बबन सराडकरांनी जीवनामध्ये खूप चढ उतार पाहिले आणि ते त्यांच्या कवितेमध्ये व्यक्त करू लागले .त्यामानाने आमचे जीवन नाही म्हटलं तरी सुखाचे होते.कॉलेजमधली नोकरी होती. बायको तपोवनात अध्यापिका होती आणि सर्वात महत्वाचं डॉ. मोतीलाल राठी, मधुकर केचे, शरदचंद्र सिन्हा, सुरेश भट,बाबासाहेब सोमवंशी,भाऊ मांडवकर या सर्वांची समर्थ साथ माझ्याबरोबर होती.मात्र त्याला सतत संघर्ष करावा लागला.. शिवाय गावला राहत असल्यामुळे करजगाव ते अमरावती हे २७-२८ किलोमीटरचे अंतरही अमरावतीला येण्यासाठी कापावे लागत होते .परंतु चांगल्या गोष्टीला अडचणी येतच असतात आणि त्या अडचणीवर मात करून उरतो तोच खरा माणूस .बबननी काही काळ शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेमध्ये संगीत विभागात काम केले. जीवनावर त्याची प्रचंड पकड होती. त्यामुळे त्याने त्याच्या मुलाला शाळेत टाकलेच नाही ..पण त्याला इतके चांगले घडवले की आमच्या सगळ्या मित्रमंडळींमध्ये त्याचा मुलगा संगीतात साहित्यात बोलण्यात कवितेत चित्रकलेत नंबर वन वर आहे ..थोडक्यात अष्टपैलू आहे. शेती करून शेतीचे खाजखळगे अनुभवून जीवनामध्ये यशस्वी झालेला कवी म्हणून मला सराडकरांचा उल्लेख करावा लागेल. त्यांचा स्वभाव थोडा वेगळाही आहे .अबोल आहे .ते त्यांच्या तंद्रीतच असतात.याचे कारण की त्यांनी आचार्य रजनीश विचार मनात पचवून टाकलेला आहे. स्वतःला तयार करा. स्वतःला आनंदित ठेवा आनंद हा स्वतःमध्ये आहे. कारमध्ये बंगल्यामध्ये वस्तूनिष्ठ गोष्टींमध्ये तो नाही .हे सूत्र या कवीला गवसले आहे. अनेकांची मुलं परदेशात आहेत अनेकांची चांगली घरे आहेत आणि अनेकांना मोठ मोठ्या गाड्या घेण्याचे भाग्य लाभलेले आहे .परंतु ह्या वस्तुनिष्ठ गोष्टी आनंद देतीलच असे नाही पण तो आनंद असतो साध्या सरळ जगण्यामध्ये आणि ही साधी सरळ गोष्ट या कवीला जमली आहे. खरं म्हणजे हे असे जमणे अवघड असतं. प्रत्येक जण स्वतः च्या तोऱ्यात असतो. रुबाबात राहतो आणि खऱ्या जीवनाला मुकतात.या कविला मात्र तो अहंकार शिवला नाही आणि शिवणाऱही नाही. =============== *प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे, संचालक* मिशन IAS अमरावती.9890967003

*संवाद मिडिया*

*प्रवेश देणे चालू आहे !!*
१० वी १२ वी(सायन्स, आर्ट ,कॉमर्स) किंवा ग्रॅज्युएशन नंतर वैद्यकीय क्षेत्रातील शॉर्ट टर्म कोर्स करा आणि शासकीय निमशासकीय हॉस्पिटल व डायग्नोस्टिक सेंटर येथे घडवा आपलं करिअर!
*आरोग्य क्षेत्रात नौकरीची सुवर्ण संधी!!!!!*
*शिकविण्यात येणारे कोर्सेस :-*
💀 *रेडिओलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*
१. एक्सरे टेक्निशियन
2.सी टी स्कॅन
३.एम.आर.आय. टेक्निशियन
४. डी एक्स आय टी
🧪 *पॅथोलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*💉
१.एम.एल.टी
२.डी. एम. एल. टी
३. ऍडव्हान्स डी. एम. एल. टी*

*इतर कोर्सेस :-*
१.ओ.टी टेकनॉलजी.
२. डिप्लोमा इन ओ टी.
३.डायलेसिस टेकनॉलजी
४. डिप्लोमा इन डायलेसिस टेक्नॉलॉजी
५. डिप्लोमा इन इ. सी जी टेक्नॉलॉजी
६. डिप्लोमा इन इ. इ. जी. & इ.एम. जी. टेक्नॉलॉजी
७. नर्सिंग केअर

● *फी मधे आकर्षक सूट*
● *अनुभवी प्रशिक्षक*
● *प्रात्यक्षिकसाठी दवाखान्यात प्रक्षिशण उपलब्धता*
*पत्ता* :-
*उत्कर्ष अकॅडमी ऑफ ग्लोबल करीअर*
*पहिला मजला,देवरुख एस.टी.स्टॅण्ड, देवरुख*रत्नागिरी-४१५८०४*
*मोबाईल- 8369106430/8291348515*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/109085/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा