सावंतवाडी
सातार्डा श्री देव रवळनाथ जत्रोत्सव रविवार दि.२९ नोव्हेंबर रोजी होत आहे. यावर्षी कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून साध्या पद्धतीने जत्रोत्सव साजरा करण्याचा सातार्डा देवस्थान कमिटीने एकमताने निर्णय घेतला आहे.
जत्रोत्सव व सोमवार दि.३० नोव्हेंबर ला होणारा कवळास (कौल) हे दोन्ही कार्यक्रम कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सातार्डा गाव मर्यादित असल्याने देवस्थानचे मानकरी व इतर मंडळी मिळून देवाचे धार्मिक विधी पार पाडणार आहेत. त्यामुळे यावर्षी ओटी भरणे, नवस फेडणे, कौल घेणे व इतर कार्यक्रम कोविड संसर्गाच्या खबरदारीचा उपाय म्हणून होणार नाहीत याची भाविकांनी नोंद घ्यावी व मंदिराच्या आवारात गर्दी न करता घरी राहून देवाची उपासना करावी व श्री देव रवळनाथ देवस्थान कमिटीला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.