You are currently viewing “आनंदक्षण”… पू.गोगटे गुरुजी प्रतिष्ठान तर्फे आजगाव येथे विनामूल्य इंग्रजी व्याकरण वर्ग

“आनंदक्षण”… पू.गोगटे गुरुजी प्रतिष्ठान तर्फे आजगाव येथे विनामूल्य इंग्रजी व्याकरण वर्ग

*साहित्यिक विनय सौदागर यांचा स्तुत्य उपक्रम*

 

‘पू. गोगटे गुरुजी प्रतिष्ठान’ तर्फे आजगावला विनामूल्य इंग्रजी व्याकरण वर्गाची सुरुवात झाली असून शालेय मुलांसाठी घेण्यात येणाऱ्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या इंग्रजी व्याकरण वर्गातील मुलांना मोफत डिक्शनरी दिल्या असून मुले ती हाताळतात, शब्द शोधतात, आणि उत्तरे झटपट देतात. उदा. मुलाना फळ्यावर verb लिहून दिलं की, त्याचं भूतकाळी रूप उत्साहाने शोधतात. असे साहित्यिक श्री.विनय सौदागर यांनी सांगितले. अशाप्रकारच्या वर्गांमुळे मुलांची बौध्दीक क्षमता आणि आकलन शक्ती वाढणार असून मुलांना गाईड अथवा मोबाईल मधून उत्तर न मिळवता पुस्तकातून उत्तरे शोधून देण्याची सवय आपोआप लागणार. त्यामुळे नक्कीच मुलांना वाचनाची आवड निर्माण होईल, उत्साह वाढेल, मुलांचे भवितव्य उज्वल होईल. आज्जाव साहित्य प्रेरणा कट्टा असा दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी साहित्यिक कार्यक्रम गेली तीन वर्षे सातत्याने घेणारे श्री.विनय सौदागर नेहमीच नवनवे समाजोपयोगी उपक्रम राबवित असतात. त्यांचे वडील कै.वामन नारायण सौदागर यांच्या जन्मशताब्दी निमित्त देखील ३०/८/२३ ते ३०/८/२४ असे वर्षभर दर महिन्याला वेगवेगळे कार्यक्रम घेण्याचे त्यांनी व त्यांच्या भगिनी सौ.संध्या कामत यांनी ठरविले असून ३० ऑगस्ट ला “संस्कार वर्गाने” त्याची सुरुवात देखील केली आहे. यावेळी मुलांनी रामरक्षा, बौद्धिक खेळ, साभिनय गोष्ट, भगवद् गीतेतील श्लोक म्हणणे असे कार्यक्रम घेण्यात आले आणि मुलांना भेट वस्तू देखील देण्यात आल्या होत्या. एकूण १७ मुलांनी त्यात सहभाग घेतला होता.

असे दरमहा महिन्याच्या ३० तारखेला उपक्रम घेण्याचे श्री.विनय सौदागर व संध्या कामत यांनी निश्चित केले आहे. समाजातील विविध घटकांमध्ये सामावून वेगवेगळे उपक्रम राबविणे नक्कीच कौतुकास्पद आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा