You are currently viewing देवबाग येथील डाॕ.दत्ता सामंत हायस्कुलच्या शालेय मुलांना ऐतिहासिक ‘पावनखिंड’ चित्रपट विनामुल्य दाखविला..!

देवबाग येथील डाॕ.दत्ता सामंत हायस्कुलच्या शालेय मुलांना ऐतिहासिक ‘पावनखिंड’ चित्रपट विनामुल्य दाखविला..!

काल जि.प.शाळा व सेंट पिटर चर्चच्या शाळेंना दाखवला होता चित्रपट

मत्स्यगंधा समर्थ थिएटर्स,देवबाग यांचे तर्फे पी अॕंड पी समुह प्रा.लि. यांचे आयोजन

येथील मत्स्यगंधा समर्थ थिएटर्स,देवबाग यांचे कडून शालेय विद्यार्थ्यांना इतिहास समजावा या हेतुने ऐतिहासिक घटनेवर आधारित चित्रपट पावनखिंड देवबाग येथील शालेय विद्यार्थ्यांना आज विनामुल्य दाखवण्यात आला.हा चित्रपट विनामुल्य उपलब्ध केल्याबद्दल देवबाग येथील डाॕ.दत्ता सामंत हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री.जे.जे.पवार यांनी पत्र देत पी अँड पी समुह प्रा.लि.यांचे आभार मानले आहेत.काल देवबागच्या १ ते ३ जि.प.शाळा व सेंट पिटर चर्चच्या या शाळेंना विनामुल्य चित्रपट दाखविला होता.

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाचे इतिहासांच्या पानांमध्ये दडलेलं वैभव रुपेरी पडद्यावर अवतरले आहे. स्वराज्याची सेवा, राजांशी निष्ठा, गनिमांचा खात्मा, मृत्यू समोर उभा ठाकला तरी केली जाणारी वचनपूर्तता हे सर्व गुण शिवरायांच्या मावळ्यांच्या रक्तात अक्षरश: भिनले होते. त्यांच पवित्र रक्तानं पावन झालेल्या घोडखिंडीचा इतिहास ‘पावनखिंड’ या आगामी चित्रपटात पाहायला मिळत आहे.
अन्य शाळांसाठी मत्स्यगंधा समर्थ थिएटर्स,देवबाग येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी दि.०३.०३.२०२२ पासुन दररोज सवलतीच्या दरात ‘पावनखिंड’ चित्रपट दाखवला जाणार असल्याची माहीती पी अँड पी समुह प्रा.लि. यांनी दिली आहे.

शाळेच्या शिक्षकांनी अधिक माहितीसाठी व्यवस्थापक हेमंत कुबल ७८२२००५५८५ यांना संपर्क करावा असे आवाहन पी अँड पी समुह प्रा.लि.यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × five =