You are currently viewing गुरू…!

गुरू…!

*काव्या निनाद साहित्य मंच पुणे समूहाच्या सदस्या ज्येष्ठ कवयित्री कविता किरण वालावलकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*गुरू…!*

 

गुरुविना सारा! जन्म आहे व्यर्थ!

गुरु देती अर्थ!आयुष्याला!!१!!

 

गुरु करी सार्थ!शिष्याच्या कार्याला!

प्रबळ ध्येयाला!गुरु करी!!२!!

 

विकासा कारक!गुरु असतात!

ते घडवतात!व्यक्तिमत्व!!३!!

 

आकार मनाला!गुरुमुळे मिळे!

योग्यमार्ग कळे!विकासाचा!!४!!

 

एक तरी गुरु!जीवनी करावा!

गुरू ही विसावा!प्रकाशाचा!!५!!

 

सौ कविता किरण वालावलकर

दावणगिरी कर्नाटक

प्रतिक्रिया व्यक्त करा