You are currently viewing जेईई, नीट, एमएचटी – सीईटी प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना टॅब चे वाटप

जेईई, नीट, एमएचटी – सीईटी प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना टॅब चे वाटप

सिंधुदुर्गनगरी

 इतर मागास व बहुजन कल्याण विभागांतर्गत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर या संस्थेमार्फत JEE,NEET, MHT-CET चे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, येथे विद्यार्थ्यांना टॅब चे वाटप करण्यात आले.

            कार्यक्रम प्रसंगी महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी  समाज कल्याण विभागाचे सहायक लेखाधिकारी भालचंद्र कापडी उपस्थित होते. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) महाराष्ट्र राज्यनागपूर या संस्थेमार्फत JEE, NEET, MHT – CET चे प्रशिक्षण घेणाऱ्या जिल्ह्यातील  विजाभजइमाव व विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना टॅबटॅब कव्हर तसेच दररोज 6 GB डाटासह सिमकार्डचे वाटप मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच बरेच विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी सदर टॅबचा उत्तम उपयोग होणार असल्याचे मनोगतही मान्यवरांनी व्यक्त केले.

            यावेळी अनिल बोरीकर, अमोल श्रीमानवारसंतोष परूळेकरसुनिल बागुलरवी जाधवकलिंगणमयुर कदमआदी कर्मचारी  यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन मुख्याध्यापक आनंद कर्पे यांनी केले व आभार प्रदर्शन अनिल बोरीकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा