You are currently viewing श्रावण

श्रावण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य तथा लालीत्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम गझल*

 

*वनहरिणी वृत्त (८+८+८+८)*

 

*श्रावण*

 

माळावरती रंगबिरंगी रानफुलांनी हसतो श्रावण

खडकांमधुनी पाझर फुटता अंतरातला कळतो श्रावण

 

अवचित येते ऊन कोवळे क्षणात फिरुनी पाऊस पडे

उन्हात पाउस लपाछपीचा खेळ खेळुनी रमतो श्रावण

 

मनगटावरी बंध रेशमी कर्तव्याची जाण ठेवितो

आशिष देता भाऊराया नयनांमधुनी झरतो श्रावण

 

व्रतवैकल्य नि देवदर्शना सणासुदीचा पवित्र महिना

मंदिरातल्या भजनांमधुनी ताल सूर मग धरतो श्रावण

 

रानावनात शीळ घालतो झाडे वेली पवन छेडतो

अवचित होता स्पर्श धुक्याचा पहाटकाळी छळतो श्रावण

 

पोटरीतुनी केसर फुटता हर्षानंदे शेत डोलते

हिरव्या हिरव्या तृणपात्यांवर मोती होउन सजतो श्रावण

 

हाती घेता हात सखीचा लज्जेने ती चुरचुर झाली

आठवता ते स्वप्न रातचे गालावरती खुलतो श्रावण

 

©दीपक पटेकर (दीपी)

सावंतवाडी

८४४६७४३१९६

————————————————————–

 

*संवाद मिडिया*

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण (Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

*Advt Link👇*

————————————————–

📝 *प्रवेश सुरु!* *प्रवेश सुरु!*📝

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण ( Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

👉 Ju Kg ते आठवी वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी जेवण 🍛व क्लासची एकत्रित सुविधा 📚👩🏻‍💻

 

(होमवर्क तसेच Grammer इत्यादीचा परिपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट)📑

 

👉 TV, Mobile यापासून दूर ठेऊन मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेशीत

 

⏰ *वेळ: सकाळी 10 ते 5:30 पर्यंत*

 

👉 (मिलाग्रीस हायस्कूल मधील मुलांना पिकअप करण्याची सोय आहे)

 

*पत्ता:* बाबा फर्नांडिस F – 122, बांदेकर मेस समोर, मिलाग्रीस हायस्कूल नजिक, सालईवाडा, सावंतवाडी

 

📱 *संपर्क:*

सौ.सरोज राऊळ मो.नं: 8983757132

सौ.सुरेखा बोंद्रे मो. नं: 8975257453

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा