इचलकरंजी /प्रतिनिधी :
इचलकरंजी येथील गावभाग जामदार गल्लीतील साहित्यप्रेमी गजानन बाळासाहेब खडके यांच्या वि.स. खांडेकर यांच्या साहित्यातील भाषा सौंदर्य या विषयावरील निबंध लेखनास मोठ्या गटात प्रथम क्रमांक मिळाला.
कोल्हापूरच्या करवीर नगर वाचन मंदिरच्या वतीने पद्मभूषण कै. वि. स. खांडेकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जन्मवर्षानिमित्त वि.स. खांडेकर यांच्या साहित्यातील भाषा सौंदर्य या विषयावर खुल्या राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत इचलकरंजीचे गजानन खडके यांच्या निबंध लेखनास मोठ्या गटात प्रथम क्रमांक मिळाला. करवीर नगर वाचन मंदिर संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात या स्पर्धेचे बक्षीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे मानकरी गजानन खडके यांना देण्यात आले. या कार्यक्रमास वाचन मंदिरचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार जोशी, उपाध्यक्ष नंदकुमार मराठे, चंद्रशेखर फडणीस् , उदय सांगवडेकर, आशुतोष देशपांडे, संजीवनी तोफखाने, केदार मुनीश्वर, मनीषा शेाई यांच्यासह करवीर नगर मंदिरचे सदस्य, वाचनप्रेमी ,स्पर्धक उपस्थित होते. या यशाबद्दल गजानन खडके यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.