*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी रामदास (आण्णा) पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मातीचा पुजारी (सैनिक)*
सीमेवर असतांना, नाही दिवाळी दसरा
दुःख पापणीत तरी, नेहमी चेहरा हसरा
मातीवर प्रेम माझे, तिचं पुरविते लळा
रुजून तिच्यामध्ये, मी फुलविला मळा
एकटा असातांना, घरी धाव घेते मन
काळजाच्या तुकड्यांना, येते घरी आठवण
सोपं नसतं दोघांनाही, असं एकट राहणं
तिचं दारात येऊन, रस्त्याकडे पाहणं
जाता रजेवर घरी, येतात धावत मिठीत
सांगा किती प्रेम द्यावं, काही क्षणांच्या भेटीत
उभ्या डोळ्यांनी मी येथे, माझा वनवास पाहिला
भवताली जग जरी, जीव एकटा राहिला
माझा लाड करते ती, तीच्या बसता शेजारी
सैनिक आहे खरं, काळ्या मातीचा पुजारी
रामदास आण्णा, बुलडाणा
7987786373