You are currently viewing अंतस्फूर्ती

अंतस्फूर्ती

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम लेख*

 

*अंतस्फूर्ती*

 

आपण आजवर ऐकत आलो..भरारी घ्यावी ती फिनिक्स पक्ष्यासारखी,,तो राखेतून उंच गगनात झेपावणारा…याचा अर्थच असा की.. अशक्य असे काही ही नसते.अंतःस्फूर्तीने,मनोबलाने सगळे कार्य साध्य होऊ शकते.फिनिक्स हे सकारात्मक तेचे उदाहरण आहे.

दैवी आपदा,अकस्मात संकटे,अवर्षण, ओला दुष्काळ ,महापूर किती तरी संकटे समोर आ वासून असतात.पण ज्यांनी मनोधैर्य टिकवलं ते विचारपूर्वक सद्यस्थितीचा सामना करतात.

काळजीपेक्षा कृतीला महत्त्व देतात व कामाला लागतात.

आ. सुधाचंद्रन या सुप्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगनेचे दोन्ही पाय अपघातात गुडघ्यापासून गेल्यावर त्या खचून गेल्या नाही तर कठोर परिश्रमाने व कृत्रिम

पायांवर पुन्हा तेवढ्याच ताकदीने त्यांनी रंगमंचावर पदार्पण करून तो गाजवला!

अपंगांनी एव्हरेस्ट सर केले तर

पाय गमावलेल्या खेळाडूंनी जागतिक स्पर्धेत स्वर्णपदक जिंकले..

चित्रपटस्रुष्टीत तर अशी अनेक उदाहरणे आहेत.गानकोकीळा लता मंगेशकर व भारतरत्न यांनी प्रतिकूलतेवर मात करत आपली गायनकला जोपासून करोडो रसिक मनांवर अधिराज्य केले.या सगळ्यांनी प्राप्त परिस्थितीवर मात करण्यासाठी जणू विडा उचलला..व प्रचंड मेहनत,निष्ठा,

ध्येयाप्रत जाण्याची मनीषा बाळगून आपआपल्या क्षेत्रात

सुवर्णाक्षरांनी नाव कोरले!

समाजातील सर्वच स्तरात अशा निराशाजनक परिस्थिती वर मात करत,शिक्षण,नोकरी,व्यवसायात नावलौकीक मिळवल्याचे अनेकजणांना आपण बघतोच.

कोरोना सारख्या भयंकर आजारावरही केवळ सकारात्मक व मनाने खंबीर राहून ,अनेकजणांनी पुनर्जन्म मिळवला आहे.

असे अनेक फिनिक्स आपल्या अवतीभवती,समाजात, देशात असतात.त्यांचे जीवन बघावे,अभ्यासावे व ती सकारात्मकता आपल्या अंगी बाणवावी!आपली भरारी फिनिक्ससारखी यशस्वी होईलच!

 

🍃🍃🍁🍃🍃🍁🍃🍃

 

अरूणा दुद्दलवार@✍️

 

*संवाद मिडिया*

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण (Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

*Advt Link👇*

————————————————–

📝 *प्रवेश सुरु!* *प्रवेश सुरु!*📝

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण ( Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

👉 Ju Kg ते आठवी वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी जेवण 🍛व क्लासची एकत्रित सुविधा 📚👩🏻‍💻

 

(होमवर्क तसेच Grammer इत्यादीचा परिपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट)📑

 

👉 TV, Mobile यापासून दूर ठेऊन मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेशीत

 

⏰ *वेळ: सकाळी 10 ते 5:30 पर्यंत*

 

👉 (मिलाग्रीस हायस्कूल मधील मुलांना पिकअप करण्याची सोय आहे)

 

*पत्ता:* बाबा फर्नांडिस F – 122, बांदेकर मेस समोर, मिलाग्रीस हायस्कूल नजिक, सालईवाडा, सावंतवाडी

 

📱 *संपर्क:*

सौ.सरोज राऊळ मो.नं: 8983757132

सौ.सुरेखा बोंद्रे मो. नं: 8975257453

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा