You are currently viewing राज्यस्तरीय वेशभूषा स्पर्धेत बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांचे सुयश

राज्यस्तरीय वेशभूषा स्पर्धेत बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांचे सुयश

बांदा

अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई आयोजित राज्यस्तरीय वेशभूषा स्पर्धेत बांदा नं१केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन सुरू मिळवले‌.
१५ऑगस्ट रोजी ७६व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित राज्यस्तरीय वेशभूषा स्पर्धेत पहिली ते चौथीच्या गटात सर्वज्ञ सुर्यकांत वराडकर याने प्रथम क्रमांक,समर्थ सागर पाटील याने तृतीय, तनिष्का संदीप देसाई हिने उत्तेजनार्थ तर दुर्वा दत्ताराम नाटेकर व नाजूक आसिफ खान ,गौरव‌ घोगळे या विद्यार्थ्यांना सहभागी होऊन राज्यस्तरीय प्रमाणपत्र प्राप्त केले.
बांदा केंद्रशाळेतील विद्यार्थी विविध प्रकारच्या स्पर्धेत सहभागी होऊन सुयश मिळविण्याची परंपरा कायम राखली आहे.या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रत्नाकर आगलावे ,मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा