वेंगुर्ला :
रस्ता सुरक्षा अभियानंतर्गत आज पोलीस विभागामार्फत वेंगुर्ला बाजारपेठ गाडीअड्डा नाका येथे रिक्षा- टेम्पो चालक मालक, संघटनेचे पदाधिकारी व सदस्य तसेच दुचाकी वाहनधारक यांना वाहतुकीबाबत वेंगुर्ला पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी मार्गदर्शन केले.
रस्त्यावर अडथळा होईल अशी वाहने उभी करू नये, वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरू नये, टू व्हीलर वर हेल्मेट वापर नेहमीच करावा तसेच २ पेक्षा जास्त लोक बसवू नये, रस्त्यावरील आखलेल्या पट्याच्या चिन्हाचा वापर करावा. १८ वर्षाखालील लहान मुलांच्या हातात वाहन देऊ नये, मोबाईल कानास लावून बोलत वाहन चालवू नये, बाजारपेठेच्या ठिकाणी रहदारीस अडथळा होईल अशा ठिकाणी वाहनाचे पार्कंग केलेले आढळल्यास संबंधित वाहनधारक मालकांवर ऑनलाईन दंडात्मक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती यावेळी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी दिली.
दरम्यान गणेश चतुर्थी सण उत्साहात साजरा होताना कुठेही वाहनाची कोंडी होऊ नये यासाठी वाहन मालक-चालक यांनी दक्षता घ्यावी. अशी सुचनाही वहातुक पोलीस हवालदार मनोज परूळेकर यांनी केली. यावेळी वाहतूक पोलिस गौरव परब, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदेश कुबल, पोलिस हवालदार सुरेश पाटील, बंटी सावंत, पोलिस कोंस्टेबल अमर कांडर, तसेच रिक्षा चालक मालक संघटनेचे माजी अध्यक्ष भगवान उर्फ भाई मोर्जे, गणपत रेडकर, अरुण नाईक, सतीश परब, काका पालकर, सदानंद परब, रिक्षा टेम्पो युनियन अध्यक्ष शेखर शेणई, मकरंद गोगटे, दिलीप बागवे, हर्षद पालव, चंद्रकांत चोडणकर, धोंड आदी उपस्थित होते.