You are currently viewing पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांचे राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी केले स्वागत…

पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांचे राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी केले स्वागत…

कणकवली –

पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी संजय मधुकर धुमाळ रुजू झाले असून राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, कणकवली देवगड विधानसभा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष देवेंद्र पिळणकर यांनी भेट घेत पुषपगुच्छ देत स्वागत केले आहे.

यावेळी कृषी सेलचे जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, युवक जिल्हा सदस्य जयेश परब आदी उपस्थित होते. पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी पीआय धुमाळ यांची कणकवली पोलीस ठाण्यात बदली केली आहे. धुमाळ यांची ठाणे ग्रामीण मधून सिंधुदुर्गात बदली झाली होती, १८ नोव्हेंबर रोजी पीआय धुमाळ जिल्हा नियंत्रक कक्षात हजर झाले होते, त्यानंतर कणकवलीत रिक्त असलेल्या पोलीस निरीक्षकपदी संजय धुमाळ यांच्या बदलीचे एसपी दाभाडे यांनी आदेश काढले होते. पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या रुपात कणकवली पोलीस ठाण्याला आता नियमित पोलीस निरीक्षक मिळाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग असलेला आणि जिल्ह्यातील राजकीय घडामोडींचे केंद्रबिंदू असलेल्या कणकवली तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची पीआय धुमाळ यांच्यावर जबाबदारी असणार आहे. तसेच अलीकडेच पंधरवड्यात झालेल्या चोऱ्यांचा छडा लावून चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचीही जबाबदारी धुमाळ यांच्यावर असणार आहे.

दरम्यान धुमाळ यांचे स्वागत करताना राष्ट्रवादी पक्षाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना दिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा