You are currently viewing लेप्टोस्पायरोसीस, अतिसार, मलेरिया व डेंग्यू याच्यावर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज….

लेप्टोस्पायरोसीस, अतिसार, मलेरिया व डेंग्यू याच्यावर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज….

 …. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात पावसाळी हंगामात लेप्टोस्पायरोसीस, अतिसार, मलेरिया, डेंग्यू सदृश्य तापाचे रुग्ण आढळून येतात या रोगाच्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य यंत्रणेद्वारे आवश्यक त्या उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी दिली.

            ताप, अंगदु:खी, थंडी वाजणे, स्नायुवेदना होणे, लघवी पिवळी होणे अशा प्रकारे याची लक्षणे आहेत. रुग्णांनी ताबडतोप जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालय येथे उपचार घेण्यात यावे.

            हाता पायाला जखम झालेल्या रुग्णांनी दुषित पाणी, दुषित माती आणि साचलेल्या पाण्यापासून दूर रहावे. पायामध्ये रबरी बुट व हातामध्ये हाममौजे वापरावे. जनावरांच्या मलमूत्राशी संपर्क टाळावा.  शेतीच्या हंगामात काम करणात्या शेतकऱ्यांनी जखम असल्यास त्याला बॅन्डेज करण्यात यावे. पाळीव प्राणी माजर, कुत्रा यांच्या संपर्कात येऊ नये. घरातील व घराशेजारील परिसर स्वच्छ ठेवण्यात यावा. ब्लिचिंग पावडरने निर्जंतुकीकरण करावे, उकळलेले पाणी प्यावे. उंदीर, घूशी यांचा नायनाट करावा. नियमित ताजे व गरम अन्न खावे. बाहेरुन व शौचालयातून आल्यानंतर हात पाय स्वच्छ साबणाने धुवावेत.

            या रोगाचे निदान रक्त व लघवी तपासून करता येते. त्यासाठी उप जिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालय येथे याबाबतच्या सेवा देण्यात येत आहेत. तरी जनतेन याबाबत सतर्क राहून आरोग्य प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा