You are currently viewing फोंडाघाट आय टी आय तिठ्यावर होणार झेब्रा क्रॉसिंग

फोंडाघाट आय टी आय तिठ्यावर होणार झेब्रा क्रॉसिंग

  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

फोंडाघाट आय टी आय तिठ्यावर होणार झेब्रा क्रॉसिंग

वाढते अपघात टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या मागणीला यश

कणकवली :

कणकवली फोंडाघाट रस्त्यावरील फोंडाघाट आय टी आय तिठ्यावर असलेल्या वळणामुळे अनेक अपघात आजवर झालेले आहेत.संभाव्य वाढते अपघात टाळण्यासाठी त्या ठिकाणी पिडब्ल्यूडी कडून अधिकृत झेब्रा क्रॉसिंग बनविण्यात यावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी पिडब्ल्यूडी चे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली.पिळणकर यांच्या मागणीची तात्काळ दखल घेत कार्यकारी अभियंता सर्वगोड यांनी गतिरोधकासह झेब्रा क्रॉसिंग बनविण्याचे मान्य केले आहे.फोंडाघाट आयटीआय तिठ्यावर असलेल्या वळण्यामुळे दुचाकीसह अन्य वाहनांचेही अनेक अपघात होऊन अनेक वाहनचालक जखमी झाले आहेत. वित्तहानी झाली आहे.संभाव्य अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी तात्काळ झेब्रा क्रॉसिंग बनविण्याची मागणी पिळणकर यांनी केली.त्यानुसासर लवकरच गतिरोधकासह झेब्रा क्रॉसिंग बनविण्यात येणार आहे.

*संवाद मिडिया*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

======================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663

प्रतिक्रिया व्यक्त करा