You are currently viewing चाकरमान्यांसाठी यंदाही आमदार राणेंमार्फत मोदी एक्सप्रेस

चाकरमान्यांसाठी यंदाही आमदार राणेंमार्फत मोदी एक्सप्रेस

चाकरमान्यांसाठी यंदाही आमदार राणेंमार्फत मोदी एक्सप्रेस…

१७ सप्टेंबरला होणार रवाना; बुकिंगसाठी संपर्क साधण्याचे आवाहन…

कणकवली

दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली मतदार संघातील चाकरमान्यांसाठी मोदी एक्सप्रेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षीही एक्सप्रेस विशेष असणार असून नरेंद्र मोदी यांच्या १७ सप्टेंबर या वाढदिवसादिवशी एक्सप्रेस दादर रेल्वे स्टेशन वरून प्लॅटफॉर्म नंबर ८ वरून दुपारी १२.३० वाजता ही मोदी एक्सप्रेस रवाना होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील या एक्सप्रेसद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खाण्याची व चहापाण्याची मोफत व्यवस्था केली जाणार आहे. या रेल्वेने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना बुकिंगसाठी विधानसभा मतदारसंघातील तालुकाध्यक्षांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा